शहरं
Join us  
Trending Stories
1
२५ लाखांची टेस्ला ६० लाखांना घ्यावी लागतेय, जबाबदार कोण? आदित्य ठाकरेंचा सवाल; म्हणाले, "अडचणी आणल्या नसत्या तर..."
2
VIDEO: घाबरलेली अँकर Live शो सोडून पळाली... स्फोटांनी हादरलं सिरिया; हल्ल्याने उडाली दाणादाण
3
'महाराष्ट्र मेरीटाईम समिट २०२५' मुळे राज्याच्या सागरी क्षेत्राला बळकटी मिळेल- नितेश राणे
4
विशेष मुलांचे प्रश्न सोडवण्यासाठी शासन सहकार्य करणार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ग्वाही
5
"सोबतचे जड झाले असतील म्हणून..."; CM फडणवीसांनी दिलेल्या ऑफरवर ठाकरेंचे प्रत्युत्तर
6
₹96 च्या IPO वर गुंतवणूकदारांच्या उड्या, 142 पट सब्सक्राइब झाला; GMP ला 43 रुपयांचा फायदा!
7
भयानक!! इस्रायलचा सीरियाच्या संरक्षण मंत्रालयावर मोठा हल्ला; संपूर्ण इमारतीच्या चिंधड्या, पाहा VIDEO
8
₹ 350 वरून थेट ₹19 वर आला हा शेअर, आता लागतंय 10% चं अप्पर सर्किट; करतोय मालामाल
9
“CM फडणवीस रामासारखे चारित्र्यवान, कृष्णासारखे चतूर”; भाजपा आमदारांकडून कौतुकाचा वर्षाव
10
नीलम गोऱ्हेंचा आग्रह अन् ठाकरेंचा नकार; उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकाच फ्रेममध्ये, फक्त खुर्चीचे होतं अंतर
11
CM देवेंद्र फडणवीसांच्या ऑफरवर उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले...
12
“वयाच्या १० वर्षापासून RSSशी संबंध, मी पुन्हा येईन, पण कुठून येईन ते विचारू नका”: दानवे
13
Budget Cars: कुटुंबासाठी कमी बजेटमध्ये ७-सीटर कार शोधताय? 'हे' आहेत बेस्ट ऑप्शन! 
14
फक्त ४ हजारांत मिळणारा एआय फोन अवघ्या २४ तासांत सोल्ड आउट!
15
अनैतिक संबंधांसाठी पत्नीनं सोडली मर्यादा, केला गंभीर गुन्हा, तिला कठोर शिक्षा द्या म्हणत पती झाला भावूक 
16
जयंत पवार पायउतार होताच रोहित पवारांकडे मोठी जबाबदारी; सुप्रिया सुळेंनी केली महत्त्वाची घोषणा
17
इन्स्टावर ओळख, १४००० किमीचा प्रवास करून मुलगी भारतात, पाठोपाठ घरचेही आले अन् सर्वांना बसला धक्का
18
"उद्धवजी, तुम्हाला इकडे यायचा स्कोप, विचार करता येईल"; विधान परिषदेत देवेंद्र फडणवीसांकडून ऑफर
19
शरिया कायद्यातील 'ब्लड मनी' काय आहे? निमिषा प्रियाचा जीव वाचवण्याचा शेवटचा मार्ग
20
BHEL: दहावी पास उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची संधी, बीएचईएलमध्ये भरती सुरू, 'अशी' होणार निवड!

​टिंडर वि. थ्रीन्डर : टूसम कि थ्रीसम?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2016 20:48 IST

डेटिंग अ‍ॅप ‘टिंडर’ने स्पर्धक अ‍ॅप ‘थ्रीन्डर’ बंद पाडण्याचा निर्धार केला आहे.

दोन व्यावसायिक कंपन्यांमध्ये स्पर्धा असणे स्वाभाविक आहे. परंतु म्हणून काय दुसऱ्याचा व्यावसायच ठप्प करून टाकायचा का असा प्रश्न सध्या टेक्नोजगतात विचारले आहे.त्याचे निमित्त आहे ‘टिंडर’ वि. ‘थ्रीन्डर’ असा वाद. डेटिंग अ‍ॅप ‘टिंडर’ने स्पर्धक अ‍ॅप ‘थ्रीन्डर’ बंद पाडण्याचा निर्धार केला आहे. गेल्या काही वर्षांमध्ये ‘टिंडर’ची लोकप्रियता खूप वाढली आहे. आपल्या आवडीनिवडीला अनुरुप जोडीदार शोधण्याची अनोखी सुविधा यामध्ये असते.जिथे टिंडर दोन व्यक्तींची भेट घडून आणते तसे ‘थ्रीन्डर’ हे अ‍ॅप कपल्स अणि सिंगल्सची थ्रीसम पेअरिंग करते. दोघांच्या नावातील साधर्म्य हेच त्यांच्यामधील वादामागचे कारण आहे.थ्रीन्डरवर ‘ट्रेडमार्क उल्लंघना’ची कायदेशीर तक्रार टिंडरने करण्याचा निर्णय घेतला आहे. नावाचा उच्चार एकसारखा असल्यामुळे लोकांचा गैरसमज होऊ शकतो की दोन्ही अ‍ॅप्स एकाच कंपनीचे आहेत अशी टिंडरला चिंता वाटते. टिंडर अस्तित्त्वात आल्यानंतर दीड वर्षांनंतर थ्रीन्डर अ‍ॅप सुरू झाले.कायदेशीर कारवाई करण्यामागे टिंडर देत असलेले कारण संयुक्तिक नसल्याचे तज्ज्ञांचे म्हणने आहे. कारण ‘ग्रीन्डर’ किंवा ‘स्पूनर’ या डेटिंग अ‍ॅप्सची नावेदेखील टिंडरच्या नावासारखीच आहेत; पण टिंडरचा त्यांच्यावर आक्षेप नाही. थ्रीन्डरनेदेखील कायदेशीर लढाई देण्याचा निर्णय घेतला आहे. एवढेच नाही तर त्यांनी सोशल मीडियावर ‘#टिंडरसकमायसॉक्स’ या हॅशटॅगद्वारे टिंडरवर हल्ला सुरू केला आहे.