घरात लग्नपत्रिका साठल्या आहेत का? त्या टाकून न देता त्यापासून बनवा हे आकर्षक 5 प्रकार.
By Admin | Updated: June 22, 2017 16:49 IST2017-06-22T16:49:16+5:302017-06-22T16:49:16+5:30
लग्न पत्रिका फारच सुंदर आहेत त्या टाकून द्यावाशा वाटत नाही. मग कशाला टाकता? या पत्रिकांपासून सुंदर वस्तू तयार करता येतात .

घरात लग्नपत्रिका साठल्या आहेत का? त्या टाकून न देता त्यापासून बनवा हे आकर्षक 5 प्रकार.
- सारिका पूरकर-गुजराथी
लग्नसराई अजूनही सुरु आहे. त्यामुळे घरोघरी सुंदर,आकर्षक लग्नपत्रिका जमा झाल्याच असतील. हल्ली तर अनेकजण लग्नाचं आमंत्रणंही सोशल मीडियावरूनच देताय. पण असं असलं तरी कागदावर आकर्षक मजकूर, गणपती, ढोल-ताशे या सुंदर प्रतिकृतींचा समावेश करुन लग्नपत्रिका आजही छापून घेतल्या जातात. आता तर या छापिल लग्नपत्रिकांचंही रुपडं अधिक सुंदर झालं आहे. नवनवीन डिझाईन्स, वेगवेगळ्या पोताचे कागद यात वापरले जाताहेत. त्यामुळे या पत्रिका खूपच सुंदर दिसू लागल्याय. पण लग्नाची तिथी उलटली की या पत्रिकांचं काय करता तुम्ही? फेकून देता की रद्दीत देता? पण अनेकवेळेस पत्रिका जर खूपच सुंदर आणि आखीव रेखीव असल्या की त्या टाकून द्यायची इच्छा होत नाही. मग नकाच टाकून देऊ आता या पत्रिका. तर या पत्रिकांपासून तयार करा या काही सोप्या हटके गोष्टी.
बूकमार्क्स
लग्नपत्रिका नेहमीच पाकिटात घालून दिली जाते. या पाकिटाचा फ्लॅप हा कोरा असतो. हा फ्लॅप कापून घ्या. या कागदातून आयताकृती आकार (साधारण बूकमार्कच्या आकाराएवढा) कापून घ्या. फॅन्सी लूक हवा असेल तर आयताच्या चारही कडांवर तिरपे कट द्या. आयताच्या रुंदीच्या एका भागावर मध्यभागी छोटे भोक पाडून घ्या, यात कमी रूंदीची सॅॅटिन रिबन अडकवून टाका. या बूकमार्कवर तुम्ही एखादा छानसा संदेश, एखाद्या पुस्तकातील मोटिव्हेटिव्ह वाक्य, कवितेतील काही ओळी हातानं लिहू शकता. जेणेकरुन यास पर्सनल टच देता येईल. मुलांसाठी तुम्ही कार्टून, जोक्स, स्माईलीज काढू शकता, लिहू शकता. जर तुम्ही एखाद्याला पुस्तक भेट देणार असाल तर हे बूकमार्क त्या गिफ्टला आणखी पर्सनलाईज्ड टच देतं. आणखी एक बूकमार्कची लांबी ही पुस्तकाच्या लांबीपेक्षा किंचित जास्त असू द्या. यामुळे काय होईल, बूकमार्क पुस्तकात ठेवल्यानंतरही त्याचे एक टोक पुस्तकाबाहेर राहील आणि त्यामुळे तुम्ही सहज तुम्हाला हव्या त्या पानावर जाऊ शकाल. एरवी बूकमार्कची लांबी थोडी कमी असते आणि त्यामुळे तो थेट पुस्तकात जाऊन बसतो. त्यामुळे लवकर पान सापडत नाही.