धोनीच्या बायोपिकवर साक्षीचे प्रश्नचिन्ह!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2016 19:51 IST
‘एमएस धोनी: द अनटोल्ड स्टोरी’ पाहून धोनी तर समाधानी वाटला. पण साक्षीने मात्र चित्रपटावर काही प्रश्नचिन्ह उपस्थित केलेत.
धोनीच्या बायोपिकवर साक्षीचे प्रश्नचिन्ह!!
भारतीय क्रिकेट टीमचा कर्णधार महेन्द्रसिंह धोनी याच्यावरील चित्रपट पाहण्यास प्रेक्षक उत्सूक आहेत. नीरज पांडे धोनीच्या जीवनावर आधारित बायोपिक घेऊन येत आहेत. अलीकडे धोनी व त्याची पत्नी साक्षी यांच्यासाठी‘एमएस धोनी: द अनटोल्ड स्टोरी’ नामक या चित्रपटाचे स्पेशल स्क्रीनिंग ठेवण्यात आले होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,चित्रपट पाहून धोनी तर समाधानी वाटला. पण साक्षीने मात्र चित्रपटावर काही प्रश्नचिन्ह उपस्थित केलेत. साक्षीने कुठल्याही सीनला कट करण्यास सांगितले नाही. पण साक्षीला बºयाच प्रसंगांबद्दल कंफ्युजन होते. मग काय, नीरज पांडे यांनी साक्षीचे हे कंफ्युजन दूर केले. यानंतर कुठे साक्षीने चित्रपटाला हिरवी झेंडी दिली. सुशांत सिंह राजपूत या चित्रपटात धोनीची भूमिका साकारत आहे.