शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपतीपदासाठी राजनाथ सिंह यांचे नाव? राष्ट्रपतींनी स्वीकारला धनखड यांचा राजीनामा
2
मराठी तरुणीला मारहाण करून पळालेल्या परप्रांतीय तरुणाला मनसैनिकांनी पकडले, चोप देऊन पोलिसांच्या हवाली केले 
3
केवळ १८ महिन्यांचा संसार, मागितली १२ कोटींची पोटगी, बीएमडब्ल्यू! कोर्ट महिलेला म्हणाले... 
4
महिलांना लग्नाच्या जाळ्यात ओढून उकळायचा पैसे; मंदिरात लग्न उरकायचा अन्...
5
७/११ बॉम्बस्फोटाच्या निकालाविराेधात सरकार सुप्रीम कोर्टात; गुरुवारी सुनावणी
6
भोंग्याबाबतचे नियम दुसऱ्यांदा मोडल्यास गुन्हा नोंदवा! राज्याच्या पोलिस महासंचालकांचे आदेश
7
नवे उपराष्ट्रपती निवडताना भाजपला नाही चिंता; ४२२ सदस्यांचे समर्थन; बहुमताने एकच उमेदवार
8
अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार; शिक्षिकेला मिळाला जामीन
9
कृषिमंत्री माणिकराव कोकाटे पुन्हा वादात; म्हणे ‘शासनच भिकारी’
10
दिल्लीत लँडिंग होताच विमानाला अचानक आग; सर्व प्रवासी व कर्मचारी सुखरूप
11
मतदार यादीवरून विरोधक आक्रमकच; पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी कामकाज ठप्प
12
धनखड यांनी राजीनामा नेमका का दिला? संसदेबाहेर चर्चा
13
गडचिरोलीत विकासविरोधी कारवायांना विदेशातून फंडिंग! नक्षलींनी बंदुका सोडून मुख्य प्रवाहात येण्याचे आवाहन
14
Mumbai Local: मुंबईहून कसाऱ्याला जाणाऱ्या लोकलवर दरड कोसळली, २ प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती 
15
कॅप्टनच्या 'सेंच्युरी'नंतर टीम इंडियाकडून क्रांतीचा 'सिक्सर'! टी-२० सह इंग्लंडला वनडेतही 'धोबीपछाड'
16
‘गँग्ज ऑफ उल्हासनगर’पुढे पोलिसांचे सपशेल लोटांगण; आरोपीची पीडित मुलीच्या घरासमोर मिरवणूक
17
बिहारमधील मतदार यादीतून हटवली जाणार ५१ लाख मतदारांची नावं, या व्यक्तींचा समावेश, निवडणूक आयोगाने दिली माहिती
18
रहस्यमय रस्ता, दिवसातून केवळ दोन तासच दिसतो, मग गायब होतो, कारण काय?
19
"मी त्याला एवढंच बोलले की..."; कल्याण मारहाण प्रकरणातील पीडितेने सांगितला घटनाक्रम
20
"किसिंग सीन शूट करताना त्या अभिनेत्याने..."; अभिनेत्री विद्या बालनने सांगितला भयानक किस्सा

TECH :​भारतात ‘ट्विटर लाइट’ सुविधा सुरु, ७० टक्के डेटा वाचवता येणार !

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2017 17:20 IST

जगभरात लोकप्रिय ठरलेली मायक्रो ब्लॉगिंग साईट म्हणजेच ट्विटरने आपल्या यूजर्ससाठी ‘ट्विटर लाइट’ ही सुविधा आणली

-Ravindra Moreजगभरात लोकप्रिय ठरलेली मायक्रो ब्लॉगिंग साईट म्हणजेच ट्विटरने आपल्या यूजर्ससाठी ‘ट्विटर लाइट’ ही सुविधा आणली असून यामुळे यूजर्सला सुमारे ७० टक्के डेटा वाचवता येणार आहे. शिवाय ३० टक्के अधिक वेगाने कंटेंट अपलोड करता येणार आहे. ही सेवा ट्विटरने गुगलच्या मदतीने विकसित केली आहे.ट्विटरने भारतात सर्वप्रथम ही सेवा सुरू केली असून त्यानंतर इंडोनेशिया आणि फिलिपाइन्समध्ये लवकरच ही सेवा सुरू केली जाणार आहे. हिंदी, मराठी, बंगाली, कन्नड, तमिळ, गुजराती या सहा भारतीय भाषांसह ४२ भाषांमध्ये ट्विटर लाइट उपलब्ध असणार आहे. ट्विटर लाईट ही सेवा वेब ब्राऊजरच्या माध्यमातून वापरता येणार आहे. पण ट्विटरच्या अ‍ॅपच्या फिचर्ससारखेच सगळे फिचर्स यात वापरता येणार आहेत. ट्विटरच्या व्यवस्थापकीय संचालिका माया हरी यांनी भारतीय बाजारपेठ आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची असल्याचे नमूद केले. ट्विटरची सेवा सर्वांना मिळावी यासाठी आम्ही प्रयत्नशील असून ट्विटर लाइट हे त्यादिशेने टाकलेले महत्त्वाकांक्षी पाऊल आहे, असे त्या म्हणाल्या. ट्विटर लाइटची वैशिष्ट्ये:* हे प्रोग्रेसिव्ह वेब अ‍ॅप गुगलच्या सहकायार्ने बनवण्यात आले आहे.* डायरेक्ट मेसेज, सर्च बटन, फिड यासह अँड्रॉइड मोबाइलवर नोटिफिकेशन पाठवण्यासाठी खास फिचर.* मोबाइल आणि डेस्कस्टॉपवरही हे अ‍ॅप वापरता येईल.* mobile.twitter.com या साइटवर तुम्हाला लॉग इन करावं लागेल.* क्रिकेटप्रेमींसाठी हे अ‍ॅप पर्वणी ठरणार आहे. ‘क्रिकबझ’ या कंटेंट पार्टनरच्या माध्यमातून टी-२० सामन्यांचे ताजे अपडेट्स, सामन्यांदरम्यानच्या महत्त्वाच्या घडामोडी यूजर्सना कळणार आहेत.