TECH : जगातील पहिला ‘5G’ स्मार्टफोन लॉन्च, 1GB डाउनलोड स्पीड !
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2017 12:24 IST
1 जीबी प्रतिसेकंद डाऊनलोड करता येण्याजोगा हा जगातला पहिला 'ZTEगिगाबाईट' 5जी स्मार्टफोन चीनची दिग्गज स्मार्टफोन निर्माती कंपनी ZTE ने लॉन्च केला आहे.
TECH : जगातील पहिला ‘5G’ स्मार्टफोन लॉन्च, 1GB डाउनलोड स्पीड !
1 जीबी प्रतिसेकंद डाऊनलोड करता येण्याजोगा हा जगातला पहिला 'ZTEगिगाबाईट' 5जी स्मार्टफोन चीनची दिग्गज स्मार्टफोन निर्माती कंपनी ZTE ने लॉन्च केला आहे. बार्सिलोनामध्ये सुरू असलेल्या मोबाईल वर्ल्ड कॉंग्रेसमध्ये रविवारी कंपनीने हा फोन लॉन्च केला. हा फोन 5 जी नेटवर्कला सपोर्ट करतो आणि 2020 पर्यंत हे नेटवर्क उपलब्ध होऊ शकतं. 1 जीबी प्रतिसेकंद डाऊनलोड म्हणजे सध्या वापरात असलेल्या 4जी पेक्षा 10 पटीने जास्त स्पीड त्याचा असणार आहे. म्हणजे एखादा सिनेमा डाऊनलोड करण्यासाठी एका सेकंदापेक्षाही कमी वेळ लागेल. या फोनमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 835 प्रोसेसर आहे. मोबाईलवर टीव्ही आणि सिनेमे बघण्याची आवड असणा-यांसाठी हा फोन पर्वणी ठरणार आहे.