Tech : फेसबुक व्हिडिओ डाऊनलोड करा ‘या’ सोप्या ट्रिक्सने !
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2017 17:48 IST
अशा काही ट्रिक्स आहेत ज्यामाध्यमाने आपण आवडता विडिओ सहज डाऊनलोड करुन आपल्या संगणकात स्टोर करु शकता.
Tech : फेसबुक व्हिडिओ डाऊनलोड करा ‘या’ सोप्या ट्रिक्सने !
-Ravindra Moreसंपूर्ण जगात युजर्सच्या माध्यमातून रोज फेसबुकवर अगणित व्हिडिओ शेअर होतात. कित्येक व्हिडिओ पाहून आपल्याला स्टोर करुन ठेवण्याची इच्छा होते, मात्र डाऊनलोड कसे करावे, हे माहित नसल्यामुळे आपण ते व्हिडिओ एकदा पाहून विसरुन जातो. मात्र आता असे होणार नाही. अशा काही ट्रिक्स आहेत ज्यामाध्यमाने आपण आवडता विडिओ सहज डाऊनलोड करुन आपल्या संगणकात स्टोर करु शकता. * सर्वप्रथम आपले फेसबुक अकाउंट ओपन करावे.* आपणास जो व्हिडिओ डाऊनलोड करायचा आहे, त्या व्हिडिओला ओेपन करा.* आता आपल्या इंटरनेट ब्राऊजरवरुन त्या व्हिडिओचा ‘URL’ कॉपी करा.* आता कॉपी केलेल्या ‘URL’ला ‘fbdown.net’ या साइटच्या डाऊनलोड बॉक्समध्ये पेस्ट करा.* याठिकाणी दाखविलेल्या डाऊनलोड लिंकवर क्लिक करा आणि व्हिडिओला डाऊनलोड करा.या अगदी सोप्या प्रक्रियेने आपण फेसबुकवरील व्हिडिओ सहज डाऊनलोड करु शकता.