TECH : २जी नेटवर्कला ३जी स्पीड हवाय?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2017 16:29 IST
बऱ्याच ठिकाणी तर मोबाइल टॉवर नाहीत आणि आहेत तर स्पीड नाही. अशा परिस्थितीत व्यवसायाने शेतकरी आणि तंत्रज्ञानात आवड असणारे एका जुगाडच्या साह्याने ही समस्या कशी सोडवितात याबाबत जाणून घेऊया.
TECH : २जी नेटवर्कला ३जी स्पीड हवाय?
आज देशातील प्रत्येक गाव इंटरनेटशी कनेक्ट होऊन डिजिटल इंडियाकडे वाटचाल करताना दिसत आहे. यासाठी सरकारी यंत्रणा कामाला लागली आहे. तर दुसरीकडे गावागावातील लोक जुगाड करुन भारतात स्वत:ला डिजिटल करण्याच्या मोहिमेत व्यस्त आहेत. मात्र, भारतात दूरवरचे बरेच असे काही प्रांत आहेत ज्याठिकाणी सर्वात मोठी समस्या आहे ती मोबाइल सिग्नल आणि इंटरनेट स्पीडची. बऱ्याच ठिकाणी तर मोबाइल टॉवर नाहीत आणि आहेत तर स्पीड नाही. अशा परिस्थितीत व्यवसायाने शेतकरी आणि तंत्रज्ञानात आवड असणारे एका जुगाडच्या साह्याने ही समस्या कशी सोडवितात याबाबत जाणून घेऊया. आपल्या मोडेमला अॅल्युमिनियम फॉयलमध्ये गुंडाळा आणि सिस्टममध्ये कनेक्ट करुन सर्च सुरु करा. आपला डिव्हाईस जसाही इंटरनेटशी कनेक्ट होईल तसा अगोदरपेक्षा स्पीड जास्त मिळेल. कित्येकदा यासाठी औषधाच्या अॅल्युमिनियम पॅकिंगचादेखील वापर केला जातोे. जिथे २जी सिग्नलपण उपलब्ध नाही तिथे फॉयल लावून सर्फिंग लायक जुगाड बनविला जातो. एकप्रकारे हे आपणास ३जीच आहे. हा प्रकार आपणास गावांमध्ये जास्त पाहावयास मिळतो.