कळकट किचनही एकदम आर्टिस्टिक दिसू शकतं. फक्त या नऊ गोष्टी वाचून तर पाहा!
By Admin | Updated: May 10, 2017 17:03 IST2017-05-10T17:03:40+5:302017-05-10T17:03:40+5:30
किचनमधील कला-कुसर तर फार सोपी आहे. फार झंझट नसते त्यात.एखादं काही केलं तरी कळकट वाटणारं आपलं किचन एकदम कलात्मकही दिसू शकतं.

कळकट किचनही एकदम आर्टिस्टिक दिसू शकतं. फक्त या नऊ गोष्टी वाचून तर पाहा!
- सारिका पूरकर-गुजराथी
कला-कुसरीच्या वस्तुंनी केवळ घरातला हॉल, बैठकखोली किंवा बेडरुमचं सजवता येते असा समज असेल तुमचा तर तो आधी दूर करा. कारण किचनमध्येही तुम्हाला क्राफ्टी लूक द्यायला बराच वाव असतो. उलट किचनमधील कला-कुसर तर फार सोपी आहे. फार झंझट नसते त्यात.एखादं काही केलं तरी कळकट वाटणारं आपलं किचन एकदम कलात्मकही दिसू शकतं. किचनमधल्या कलाकुसरीची हीच तर कमाल आहे.
किचनमधली कलाकुसर
१) चहा, कॉफीचे मोठे मग असतील तर त्यावर नवीन रंगाचा प्लेन वॉश देऊन घ्या. वाळला की मग त्यावर शार्पी पेन (मार्करसारखे पेन ), अॅक्रेलिक रंगांनी आवडीचे डिझाईन्स बनवा. कधी नुसतेच ठिपके द्या रगांचे, कधी नावाची आद्याक्षरं रंगवा नाहीतर पानं-फुलं अन कार्टून रंगवा.