ऐटबाज सौंदर्याची हॅण्डलूम साडी
By Admin | Updated: April 27, 2017 17:45 IST2017-04-27T17:45:27+5:302017-04-27T17:45:27+5:30
हॅन्डलूम साड्या महाग असतात पण ग्रेसफुल दिसायचा तर या साड्याना काही पर्याय आहे का?

ऐटबाज सौंदर्याची हॅण्डलूम साडी
मोहिनी घारपुरे-देशमुख
साडी या एकाच प्रकाराविषयी बोलायचं म्हटलं तरी एक स्वतंत्र लेखमाला चालवता येऊ शकते. परंतु एकेका प्रकारच्या साड्यांची क्रेझ असण्याचा एक एक सीझन असतो. सध्या बाजारात हॅण्डलूम साड्यांची फारच चलती आहे. अशाही या साड्या बहुतेक प्रत्येकीलाच शोभून दिसतात. तसंच या साड्यांचा एक वेगळाच डौल, एक वेगळीच नझाकत असते म्हणूनच तर प्रत्येक राज्यातील विशिष्ट प्रकारच्या हॅण्डलूम साड्यांना त्या विशिष्ट राज्यात विशेष मागणी असते.
हॅण्डलूम साड्या परिधान करताना..
* हॅण्डलूम साड्या लग्न समारंभाबरोबरच एखाद्या कार्यक्र माला, उद्घाटनसोहळ्याप्रसंगी वगैरे नेसल्या तर फारच आकर्षक लूक येतो
* या साड्यांबरोबर आभुषणांची निवड करताना मात्र शक्यतो टेराकोटा ज्वेलरी किंवा धानाचे कानातले, गळ्यातले घालावेत ते जास्त शोभून दिसतात
* पारंपरिक दागिने ते ही एकाच धातूमधले असतील तर ते मात्र शक्यतो अशा साड्यांबरोबर घालू नयेत त्यामुळे साडीबरोबरचा लूक उठून दिसत नाही.
* फ्लॅट चप्पल ऐवजी सँडल्स किंवा नॉर्मल हिल्सवाल्या चप्पल घालून जास्त ऐटबाज दिसता येईल.
*सोबत अगदी खणाची पर्स वगैरे कॅरी केलीत तर उत्तम.