शहरं
Join us  
Trending Stories
1
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
2
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
3
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
4
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 
5
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
6
पाच टप्पे, ‘चौसष्टी’च्या फेऱ्यात; राजकारण ढवळले, प्रचारसभांतील आरोप-प्रत्यारोपांना मिळाला पूर्णविराम
7
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास
8
केजरीवाल यांचे माजी पीए बिभव कुमार अखेर अटकेत; स्वाती सहज बाहेर पडल्या, ‘आप’ने जारी केला व्हिडीओ 
9
प्रचारतोफा शांत; राज्यात उद्या अखेरच्या टप्प्यातील मतदान; देशातील ८ राज्यांतील ४९ मतदारसंघांत लढत
10
आता भाजप सक्षम, सगळे निर्णय स्वबळावर; रा.स्व. संघाची मदत घेण्याबाबत जे.पी.नड्डा यांचे मत
11
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
12
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
13
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
14
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
15
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
16
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
17
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
18
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
19
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
20
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...

रक्षाबंधनासाठी खास स्टायलिंग टिप्स! 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2021 7:48 AM

Special styling tips : भारतात लवकरच साजरा होणार असलेला रक्षाबंधन हा सण बहीण व भाऊ यांचं नातं साजरं करणारा सण आहे. या सणाचं पारंपरिक महत्त्व खास शैलीत जपण्यासाठी लोक नवे कपडे, वस्तू, भेटवस्तू खरेदी करतात.

– पारिका रावल (डिझाइन हेड, मडाम)

विविध सण आणि उत्सव उंबरठ्यावर असल्याने सगळीकडे उत्साहाचे वातावरण निर्माण होऊ लागले आहे. कोरोना महामारीची भीती बाजूला ठेवून लोकांनी खरेदी आणि सण साजरे करण्यास सुरुवात केली आहे. परंतु, महामारीमुळे परिस्थितीमध्ये बरेच बदल झालेले असल्याने स्टायलिंगकडे पाहण्याचा दृष्टिकोनही बदलू लागला आहे. स्टाइलमध्ये सातत्याने बदल करणे गरजेचे आहे, हे लक्षात घेऊन मदामे ट्रेंडी, आरामदायी व ऐटादार स्टाइल सादर करत असते. भारतात लवकरच साजरा होणार असलेला रक्षाबंधन हा सण बहीण व भाऊ यांचं नातं साजरं करणारा सण आहे. या सणाचं पारंपरिक महत्त्व खास शैलीत जपण्यासाठी लोक नवे कपडे, वस्तू, भेटवस्तू खरेदी करतात. गेल्या वर्षी आपल्याला नवे कपडे घालण्याची आणि सण साजरा करण्याची फारशी संधी मिळाली नाही, पण या वर्षी मात्र सण साजरा करता येई शकतात, असा शक्यता दिसू लागल्या आहेत. यंदा रक्षाबंधनाच्या निमित्ताने छान कपडे घालण्यासाठी विचारात घेता येतील, असे निरनिराळे पर्याय, तसेच काही स्टायलिंग टिप्स, आउटफिटचे पर्याय पुढे दिले आहेत.

क्रॉप टॉप आणि स्कर्ट सणांना नेहमीच स्कर्ट चांगले दिसतात आणि योग्य प्रकारचा टॉप, ब्लाउज किंवा शर्ट यांबरोबर ते साजेसे दिसतात. तुम्ही प्लेटेड, ए-लाइन, फुल-लेंथ अम्ब्रेला-स्टाइल किंवा अँकल-लेंथ स्कर्ट निवडू शकता. सध्याचा ट्रेंड स्कर्ट आणि कॉलर्ड शर्ट असा आहे. भरजरी स्कर्ट निवडलात तर त्याच्याबरोबर पांढऱ्या किंवा अन्य कोणत्याही रंगाचा प्लेन शर्ट चांगला दिसू शकेल. प्लेन शर्टमुळे स्कर्टचे रंग अधिक उठून दिसतात. या कपड्यांबरोबर, योग्य अक्सेसरीज आणि केसांचा हाय पोनीटेल बांधला तरी रुप अधिक खुलेल. 

कुर्ता आणि ट्राउझर किंवा जीन्स कुर्ता आणि पँट घालण्याची पद्धत अनेक दशके आता सर्रास दिसून येते. तुम्हाला पारंपरिक दिसायचं आहे आणि कपडेही आरामदायी हवे आहेत, तर हे कपडे अतिशय सोयीचे ठरतात. सणासुदीसाठी आवश्यक असलेलं आधुनिक व क्लासी रूप, आरामदायीपणा या कपड्यांतून नक्की मिळतो. आणखी खुलून दिसण्यासाठी टिकली, बांगड्या आणि ऑक्सिडाइज्ड दागिने घातले तर आपलं रूप साधं, पण स्टायलिश दिसेल आणि सर्वांचं लक्ष वेधून घेईल. तसेच, तुमच्याकडे वेळ फार कमी असेल तर झटपट तयार होण्यासाठी हे कपडे साजेसे ठरतात. कुर्ता स्ट्रेट फिट, व्ही-नेक, स्लीव्हलेस किंवा थ्री-क्वार्टर स्लीव्हचा निवडा.  एथनिक मॅक्सी ड्रेसेस फुल-लेंथ मॅक्सी ड्रेस हा अधिक पारंपरिक दिसण्यासाठी शहरी भागासाठीचा ड्रेस आहे. अनेकदा हा ड्रेस गाउन किंवा लेहेंगा यासारखा दिसतो आणि त्याच्या कापडाच्या फ्लोमुळे व फ्लेअर्ड हेममुळे रूबाबदार दिसतो. या ड्रेसमध्ये नाजूक, किमान डिझाइन असल्यानं तो राजबिंडं दिसण्यासाठी योग्य ठरतो. त्याबरोबर झुमके, हील्स व हलका मेक-अप उठून दिसतो. सेल्फ-डिझाइन स्लीव्ह, फ्लाउन्स्ड हेम, जोडलेल्या लायनिंगसह वोव्हन मॅक्सी ड्रेस असा इंडो वेस्टर्न एथनिक मॅक्सी ड्रेसही निवडू शकता. छान नेकपिस व मॅचिंग हील्स हा ड्रेस परिपूर्ण करतात.

ए-लाइन ड्रेस सणासुदीदरम्यान सर्वांमध्ये उठून दिसायचं असेल तर ए-लाइन ड्रेस हा उत्तम पर्याय आहे. व्ही नेक, बबल स्लीव्ह, फ्लेअर्ट हेम, पुढे स्लिट अशी फॅशन असलेला, छान प्रिंट असलेला ए-लाइन ड्रेस घातला तर तुम्ही नक्की सगळ्यांमध्ये उठून दिसाल. ठळक रंग वापरण्याचा प्रयोगही तुम्ही करू शकता. त्याबरोबर अनेकदा लांब कानातले आणि हाय हील्स घातले जातात. ए-लाइन ड्रेसचा आणखी एक प्रकार म्हणजे, ब्लाउसन ड्रेस. हा ड्रेस अनेकदा पेस्टल, अर्दी व बेज शेडमध्ये असतो. ड्रेसच्या वरच्या भागात ब्लाउज पॅटर्न असतो, कमरेवर क्लिंच असतो. भरपूर बांगड्या, गोल्ड हील्स, कमीत कमी मेक-अप असल्यास रूप अधिक खुलून दिसू शकेल. 

एथनिक जाकिट लेहेंगा व ब्लाउज आणि दुपट्टा वापरण्याऐवजी तुम्ही केपची निवड करू शकता. तुमच्या आवडत्या साडीबरोबर एथनिक जाकिट घालण्याचाही विचार करू शकता. थोडा वेस्टर्न लूक देण्यासाठी त्याबरोबर वेस्टबँड, एजी बेल्ट घाला. जाकिट आणि बाकी कपड्यांची रंगसंगती नेहमी रूप खुलवते. 

ट्विनिंग आउटफिटकपड्यांचं ट्विनिंग करणं, हा सध्याचा लोकप्रिय ट्रेंड आहे. इतरांपेक्षा वेगळं दिसायचं असेल तर तुमच्या भावासारखे कपडे घाला. यामुळे प्रत्येकाचं लक्ष तुमच्याकडे वेधलं जाईल. भावंडांमधलं घट्ट नातं दाखवणारे, धमाल दिसणारे अनेक ट्विनिंग सेट सहज उपलब्ध आहेत. गमतीदार प्रिंट, कॉटन सेट किंवा बहीण व भाऊ यांची आवड लक्षात घेऊन तयार केलेले थीम-बेस्ट आउटफिट यांची निवड तुम्हाला करता येईल. इंडो-वेस्टर्न आउटफिट व अबस्ट्रॅक्ट प्रिंट यासाठी अनेकांना मिंट, गुलाबी, ग्रे, पीच अशा पेस्टल छटा आवडतात. तुम्ही आर्द्रता व उकाडा अधिक असलेल्या ठिकाणी राहत असाल तर मिरर वर्क असलेल्या कुर्ती, जॉर्जेट व शिफॉन मॅक्सी ड्रेस निवडू शकता. आरामदायी वाटतील असे कपडे निवडणं आणि त्याबरोबर योग्य फूटवेअर, दागिने व अक्सेसरीज घालणं महत्त्वाचं आहे. यामुळे तुम्ही ऐटदार दिसाल. तुम्हाला नवे प्रयोग करायला आवडत असेल तर सगळ्या गोष्टी साध्य निवडाव्यात, जसे सिम्पल लूक ठेवून आणि लिपस्टिक किंवा डोळ्यांसाठी एक ठसठशीत रंग निवडून मेक-अप साधा करावा. भारताला आंतरराष्ट्रीय संस्कृतीशी पुरेशी ओळख झालेली आहे, परंतु त्याचबरोबर देशातल्या वैशिष्ट्यपूर्ण आणि पारंपरिक कपड्यांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. थोडी स्टाइल, ट्रेंड आणि फॅशन यांची सांगड घालून सणांदरम्यान पारंपरिक कपडे परिधान करायला हरकत नाही.

टॅग्स :fashionफॅशनRaksha Bandhanरक्षाबंधन