सेलिब्रिटींसोबत सेल्फी काढण्याचे स्पेशल फंडे
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2016 02:29 IST
आपल्या आवडत्या हीरोचा फोटो किंवा ऑटोग्राफ मिळवण्यासाठी चाहते काय काय नाही करत.
सेलिब्रिटींसोबत सेल्फी काढण्याचे स्पेशल फंडे
आपल्या आवडत्या हीरोचा फोटो किंवा ऑटोग्राफ मिळवण्यासाठी चाहते काय काय नाही करत. आता फोटो किंवा ऑटोग्राफचा जमाना तसा राहिला नाही. चाहत्यांना सेलिब्रिटींसोबत सेल्फी काढायची असते. परंतु ते एवढे सोपे नाही. एखादा अँक्टर, पॉप स्टार किंवा एथलिटसोबत सेल्फी काढणे हीसुद्धा कला आहे. पण जर तुम्हाला खरंच सेलिब्रिटींसोबत सेल्फी काढायचा असेल तर पुढील फंडे वापरल्यास तुमचे चान्सेस नक्कीच वाढतील.१. सेलिब्रिटींना भेटण्याची सर्वात चांगली संधी म्हणजे त्यांच्या फिल्म प्रिमिअरला जाणे. तिथे हमखास सेल्फी मिळेल.२. स्टार्ससारखी वेशभुषा३. तुमच्यासोबत दुसरा कोणी तरी प्रसिद्ध व्यक्ती न्या.४. तुमच्याकडे एखादा क्युट पपी पाहून सेलिब्रेटींचे मन नक्कीच वितळेल.५. सोबत सेल्फी स्टिक राहू द्या. तुमची तयारी पाहून ते नक्कीच इंम्प्रेस होतील.६. आकर्षक कपडे घालून जा.७. तुमचे आणि सेलिब्रिटीचे नाव जर सारखे असेल तर त्यांना सेल्फी काढायला आवडेल.८. एखादा गणवेश घालावा. गणवेशधारी लोकांना स्टार्स सहसा नाराज करत नाहीत.९. त्यांच्या नावाने जोरजोरात ओरडून त्यांचे लक्ष स्वत:कडे वेधून घ्या.