‘पदरावरती जरतारीचा मोर नाचरा हवा’ गाणं जुनं आहे. पण मोराची नक्षी असलेला ड्रेस , साडी, पैठणी, शालू प्रत्येकीलाच हवा आहे अगदी आजही !
By Admin | Updated: June 1, 2017 19:32 IST2017-06-01T18:50:44+5:302017-06-01T19:32:07+5:30
साडीबरोबरच कुर्ती,ड्रेस, ओढणी, सलवार अशा कोणत्याही ट्रॅडिशनल, सेमीट्रॅडिशनल कपड्यांवर मोराची नक्षी छान दिसते

‘पदरावरती जरतारीचा मोर नाचरा हवा’ गाणं जुनं आहे. पण मोराची नक्षी असलेला ड्रेस , साडी, पैठणी, शालू प्रत्येकीलाच हवा आहे अगदी आजही !
- मोहिनी घारपुरे-देशमुख
पावसाळा सुरू होण्याचे वेध सगळ्यांनाच लागलेले आहेत. पाऊस पडायला लागल्यावर मोर पिसारा फुलवून थुईथुई नाचतो. तसेच फॅशनच्या जगतातही डिझायनर्सना मोर खुणावू लागतो. पदरावरती जरतारीचा मोर नाचरा हवा असं म्हणत म्हणत साड्या, शालू, पैठणी साऱ्याजणी मोराच्या नक्षीकामानं अधिकाधिक सुंदर दिसू लागतात.
खरंच, फॅशनच्या जगात पारंपरिक पद्धतीच्या साड्या आणि ड्रेसेसवर मोराची डिझाईन नेहमीच इन असते. आणि ती सदैव इन राहिल यात शंका नाही.