शीख समुदायाचे ओबामांकडून कौतुक
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2016 08:08 IST
मानवतावादी बचावकार्याची अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी प्रशंसा केली आहे
शीख समुदायाचे ओबामांकडून कौतुक
शीख समुदायाचे ओबामांकडून कौतुकजगभरात जेव्हा जेव्हा नैसर्गिक आपत्ती आल्या तेव्हा शीख समुदाय मदतीसाठी धावून गेला. या समुदायाने केलेल्या मानवतावादी बचावकार्याची अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी प्रशंसा केली आहे. वॉशिंग्टनमध्ये आयोजित जगभरातील नेते व धर्मगुरुंच्या परिषदेत ओबामा बोलत होते.हैतीमध्ये भयानक भूकंप झाला तेव्हा ख्रिश्चनांसह शीख समुदायही मदतीसाठी धावला. जखमींना तंबूची व्यवस्था, रुग्णालयात त्याची ने-आण करणे तसेच मदतकार्याच्या वाटपात शीख समाजाने मोलाची कामगिरी बजावली. बेघर, निराधारांना मदत करण्यात चर्चसह, गुरुद्वारा, मंदिरे, मशिदीचे प्रमुखही पुढे आले. आपण सर्व समान व एकाच ईश्वराची लेकरे आहोत, हेच त्यातून दिसून आले. जेव्हा इबोला या भयानक आजाराने पश्चिम आफ्रिकेत हैदोस घातला, तेव्हा ही सर्व धर्मस्थळे एकजुटीने रुग्णांना मदतकार्यात आघाडीवर होती. प्रेम व बंधूभावाचा संदेश देणारी ही त्यांची एकजूट विश्वबंधुत्वाचा प्रत्यय आणणारी आहे. आपण सर्व एकमेकांचे बंधू आहोत, नैसर्गिक आपत्तीसह सर्व संकटांत आपण सर्व एकाच ईश्वराची लेकरे आहोत, हेच सर्वांच्या प्रेमातून दिसून आले, असे ओबामा म्हणाले.