आॅफ शोल्डर ,कोल्ड शोल्डर कोण म्हणतं ही फॅशन जुनी आहे? शिल्पा अनुष्का आणि भूमीकडे पाहा ना!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2017 20:01 IST2017-08-14T19:56:11+5:302017-08-14T20:01:45+5:30

वॉर्डरोबमध्ये तुम्हाला काही प्रॉमिनन्ट बदल करायचा असेल तर तुम्ही एकदा तरी आॅफ शोल्डर आणि कोल्ड शोल्डर ट्राय करून पाहायला हवेत.

off shoulder and cold shoulder - 80's fashion comes back. Try like Shilpa And Anushka | आॅफ शोल्डर ,कोल्ड शोल्डर कोण म्हणतं ही फॅशन जुनी आहे? शिल्पा अनुष्का आणि भूमीकडे पाहा ना!

आॅफ शोल्डर ,कोल्ड शोल्डर कोण म्हणतं ही फॅशन जुनी आहे? शिल्पा अनुष्का आणि भूमीकडे पाहा ना!

ठळक मुद्दे* आॅफ शोल्डर ड्रेसेसमध्ये शोल्डर स्ट्रॅप्स नसतात. त्यामुळे शोल्डर लाईन पूर्णत: ओपन असते.* कोल्ड शोल्डर ड्रेसेसमध्ये नेकलाईन असते तसेच शोल्डर स्ट्रॅप्सही असतात. परंतु एक्झॅक्टली खांद्याच्या पोर्शनच्या स्लीव्ह्ज नसतात.* बाजारात आणि आॅनलाईन शॉपिंग वेबसाइट्सवर सध्या या प्रकारच्या ड्रेसेसची असंख्य व्हरायटी उपलब्ध आहेत. मॅक्सी ड्रेसेसमध्ये तर हमखास हा प्रकार दिसतो.

 

- मोहिनी घारपुरे-देशमुख


साधारणत: 80 च्या दशकात बूममध्ये असलेला आॅफ शोल्डरचा ट्रेण्ड आता पुन्हा नव्यानं आला आहे. त्याचबरोबर कोल्ड शोल्डर हा नवा प्रकारही फारच लोकप्रिय झाला आहे.
मुलींच्या वॉर्डरोबमधील कपड्यांमध्ये अत्यंत सुंदर आणि सुपर फेमिनाईन दिसणारे हे दोन्हीही प्रकार. या दोन्हीहीमध्ये वरवर पाहिलं तर फार मोठा फरक दिसणार नाही परंतु तरीही बेसिक सारखं असलं तरीही सूक्ष्मसा पण प्रकर्षानं दिसणारा बदल केल्यानं हे दोन्हीही प्रकार निराळे दिसतात.

आॅफ शोल्डर ड्रेसेसमध्ये शोल्डर स्ट्रॅप्स नसतात. त्यामुळे शोल्डर लाईन पूर्णत: ओपन असते. हे ड्रेसेस खूपच छान दिसतात. विशेषत: आॅफ शोल्डर ड्रेस आणि ब्रेस्ट लाईनला हायलाईट करणारे रफल्स असे शॉर्ट ड्रेसेस खूपच लोकप्रिय आहेत. अनेक उंच महिला पार्टीला जाताना असेच ड्रेसेस प्रेफर करतात. यामुळे सेक्सी, कॅज्युअल आणि आणि वेस्टर्न लुकचा तोल साधणण शक्य होतं.

कोल्ड शोल्डर ड्रेसेसमध्ये नेकलाईन असते तसेच शोल्डर स्ट्रॅप्सही असतात. परंतु एक्झॅक्टली खांद्याच्या पोर्शनच्या स्लीव्ह्ज नसतात. त्यामुळे संपूर्ण शोल्डर लाईन नव्हे तर फक्त खांद्यांचा भाग उघडा दिसतो. परंतु गळा आणि छातीचा भाग झाकलेल्या स्थितीत असतो. या ड्रेसेसमध्ये बेल स्लीव्हस, थ्री फोर्थ स्लीव्हस, फुल स्लीव्हस असे पॅटर्नस दिसतात.


हे ड्रेसेस केवळ शॉर्ट नसून लाँग ड्रेसेसही खूपच सुंदर दिसतात. अलिकडे अनेक बॉलीवूड अ‍ॅक्ट्रेसेसनी कोल्ड शोल्डर ड्रेसेसला पसंती दिली आहे. या ड्रेसेसबरोबर हाय हिल्सच शोभून दिसतात.
आपल्याकडे पारंपरिक समारंभ वगळता अन्य लहानमोठ्या समारंभांना आॅफ शोल्डर आणि कोल्ड शोल्डर ड्रेसेस ट्राय करायला काहीच हरकत नाही. हे ड्रेसेस इतके सुंदर दिसतात की त्यामुळे व्यक्तिमत्त्व उठून दिसायलाही मदत होते.

बाजारात आणि आॅनलाईन शॉपिंग वेबसाइट्सवर सध्या या प्रकारच्या ड्रेसेसची असंख्य व्हरायटी उपलब्ध आहेत. मॅक्सी ड्रेसेसमध्ये तर हमखास हा प्रकार दिसतो. तुम्हाला जर तुमच्या वॉर्डरोबमध्ये काही प्रॉमिनन्ट बदल करायचा असेल तर तुम्ही एकदा तरी आॅफ शोल्डर आणि कोल्ड शोल्डर ट्राय करून पाहायला हवेत.

 

 

Web Title: off shoulder and cold shoulder - 80's fashion comes back. Try like Shilpa And Anushka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.