शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवार हे महाराष्ट्रातील कट कारस्थानाचा कारखाना, त्यांच्यावर..."; गोपीचंद पडळकरांची बोचरी टीका
2
दिल्ली-मुंबई हल्ल्यात मसूद अजहरचा हात; जैश कमांडर इलियासचा आणखी एक कबुलीजबाब
3
मंत्र्यांच्या बंगल्यांच्या दुरुस्तीसाठी कोटींची उधळपट्टी? कंत्राटदाराने २१ टक्के 'बिलो'ने काम घेतल्याने प्रकार उघडकीस
4
राज्यात ३९४ ठिकाणी 'नमो उद्यान' विकसित करणार; नरेंद्र मोदींच्या वाढदिवशी एकनाथ शिंदे यांची घोषणा
5
"आमचे प्रेरणास्रोत..."; पंतप्रधान नरेंद्र मोदींना इटलीच्या जॉर्जिया मेलोनी यांच्याकडून खास शुभेच्छा
6
५% व्याजावर ३ लाख रुपयांपर्यंतचं लोन; 'या' लोकांसाठी आहे मोदी सरकारचं मोठं गिफ्ट
7
माँसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर रंग फेकला, ठाकरे गट आक्रमक, दादरमध्ये तणाव
8
कंपन्या जीएसटी रिकव्हरीच्या मुडमध्ये! २२ सप्टेंबरआधीच शाम्पू, साबण २० टक्के डिस्काऊंटवर विकू लागल्या... 
9
"महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर करा, शेतकऱ्यांना  हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत द्या’’, काँग्रेसची मागणी   
10
पत्नीचं अफेअर, पतीला लागली कुणकुण; जळफळाट झाला अन् खुनी खेळ रंगला!
11
सॉवरेन गोल्ड बॉंड गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी! ६ वर्षांत १८३% परतावा, RBI ने जाहीर केली मुदतीपूर्वीची किंमत
12
WiFi कनेक्शन बंद केल्याने पोटच्या लेकानेच केली आईची हत्या; वडील म्हणाले, "मुलाला फाशी द्या"
13
"अमेरिका, युरोपमधून इस्लाम संपुष्टात आणणार’’, ट्रम्प समर्थक महिला नेत्याचं वादग्रस्त विधान  
14
आता जेवढा जीएसटी कमी झालाय ना, तेवढ्याला १९८६ मध्ये बुलेट मिळत होती...
15
बोल्ड लूकसह स्मार्ट फीचर्स! होन्डाची पहिली इलेक्ट्रिक बाईक लॉन्च, एका चार्जवर १३० किमी धावणार
16
लग्नाच्या अवघ्या २०व्या दिवशी नवरी झाली फरार; नवऱ्याला म्हणाली लवकर जाऊन येते अन्...
17
पंतप्रधान नरेंद्र मोदींवरील बायोपिकची घोषणा, हा अभिनेता साकारणार भूमिका, पोस्टर रिलीज
18
"२४ तासांच्या आत कळलं पाहिजे"; मीनाताईंच्या पुतळ्यावर रंग फेकल्याच्या प्रकरणावरुन राज ठाकरेंचा इशारा
19
जय शाह आणि अनुरग ठाकूर शाहिद आफ्रिदीला भेटले? जाणून घ्या 'त्या' VIDEO चे सत्य...
20
पगारापेक्षा जास्त घरभाडे; SEBI ने आपल्या प्रमुखांसाठी घेतले अपार्टमेंट, मासिक भाडे तब्बल ₹७ लाख

हे वाचून आपल्या केसांसाठी हेअर ड्रायर वापरावा का? याचा विचार तुम्ही नक्की कराल!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2017 19:13 IST

सारखे सारखे केस धुण्यानं केसांची जी हानी होते त्याच्या दसपट हानी ही हेअर ड्रायरने केस सुकवल्यामुळे होते.

- माधुरी पेठकरसुंदर दिसणं हे काही फक्त आता चेहरा आणि कातडीचा रंग यावरच अवलंबून राहिलेलं नाही. पायाच्या नखांपासून डोक्यावरच्या केसांपर्यंत अनेक प्रयोग केले जातात. कारण एकच ते म्हणजे फॅशनेबल दिसायचं. पण या प्रयोगामुळे कधीकधी फायदा होण्यापेक्षा नुकसानही होतं. पण हे लक्षात येईपर्यंत वेळ निघून गेलेली असते. त्वचेप्रमाणेच केसांवरही नाना प्रयोग केले जातात. स्टाइलच्या नावाखाली केसांवर असे उद्योग केले जातात की त्यामुळे केसांमधलं मूळ सौंदर्यच हरवून जातं. केस सरळ असले की त्याला कुरळे करायचे असतात आणि कुरळे असले की स्ट्रेट करायचे असतात. केस सारखे धुवायचे असतात आणि घाई इतकी की सेकंदा मीनिटात वाळवायचेही असतात. मग काय या प्रत्येक गोष्टीसाठी उपकरणांचा आधार घेवून केसांशी अक्षरश: खेळलं जातं.

 

हेअर ड्रायरचा उपयोग केसांसाठी केवळ ब्युटीपार्लरमध्येच होतो असं नाही. तर येता जाता सोयिस्कर पडावं, छोट्या छोट्या गोष्टींसाठी पार्लरच्या फेऱ्या नकोत म्हणून हा हेअर ड्रायर अनेकजणी घरीच आणून ठेवतात. कधीही केस धुवायचेत आणि हेअर ड्रायरनं वाळवायचे असा छंद अनेकजणींना जडला आहे. पण हा छंद महागात पडू शकतो. नव्हे महागात पडतो असं प्रत्यक्ष शास्त्राचं अर्थात विज्ञानाचंच मत आहे. यासंदर्भात अभ्यास करणाऱ्यांनी आपल्या अभ्यासातून हे सिध्द केलं आहे की हेअर ड्रायरमुळे केसांचं कधीही भरून न येणारं नुकसान होतं. सारखे सारखे केस धुण्यानं केसांची जी हानी होते त्याच्या दसपट हानी ही हेअर ड्रायरने केस सुकवल्यामुळे होते. हेअर आर्यनिंग करताना जे उपकरण वापरलं जातं त्यामुळेही केस खराब होतात.

 

हा निष्कर्ष काढताना अभ्यासकांनी त्यामागचं कारण संगितलं आहे. हेअर ड्रायरमधली तसेच हेअर आर्यनमधली हवा अतिशय उष्ण असते. त्याचा परिणाम केसातील पाण्यावर होतो. नखाच्या वरती त्वचेचा जसा पातळ पापुद्रा असतो तसाचा पापुद्रा हा केसांवरही असतो. या पापुद्रामध्ये केसांना मॉयश्चर पुरवणारं पाणी असतं. हेअर ड्रायरमधील गरम हवेनं या पाण्यात बुडबुडे निर्माण होतात. त्याचा परिणाम म्हणजे केसांवर ताण येतो आणि केस तुटतात. केस खराब होतात. केसातलं मॉयश्चर संपून केस कोरडे होतात. केसांना फाटे फुटतात. सारखा हेअर ड्रायर वापरल्यानंच नाही तर एकदा दोनदा हेअर ड्रायर वापरल्यानंही केसांच तेच नुकसान होतं. केसांना नैसर्गिकरित्या कोरडं करून हेअर ड्रायर टाळणं हा केस सुंदर ठेवण्याचा आणि करण्याचा उत्तम उपाय आहे.