SHOCKING : ...तर तुमचा जिओचा नंबर होईल बंद!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2017 17:04 IST
जर तुम्ही जिओ ग्राहक असाल तर, या कारणाने तुमचा नंबर होऊ शकतो बंद, काय आहे कारण जाणून घ्या !
SHOCKING : ...तर तुमचा जिओचा नंबर होईल बंद!
-Ravindra More१५ एप्रिल जिओ यूझर्ससाठी धन धना धन आॅफर अंतर्गत रिचार्ज करण्याची अखेरची तारीख होती. पण ज्या यूजर्सनी रिचार्ज केलेले नाही त्यांच्यासाठी अखेरची संधी ही आहे की ते माय जिओ अॅप, जिओच्या वेबसाईट अथवा जिओ स्टोरवर जाऊन रिचार्ज करु शकतात. जर तुम्ही एकही रिचार्ज केलं नसेल तर तुमचं सिमकार्ड बंद होऊ शकतं. जर तुम्ही आतापर्यंत या आॅफरसाठी रिचार्ज केले नसेल तर ४०८ रुपयांचे रिचार्ज(९९+३०९) करुन ही आॅफर मिळवू शकता. आतापर्यंत कंपनी आपल्या वेबसाईटसहित माय जिओ अॅपवर प्राईम सबस्क्रीप्शन आणि धन धना धन आॅफर मिळवण्याची संधी देतेय. प्राइम मेंबरशिप मागे घेण्याचे आदेश दिल्यानंतर काही दिवसातच रिलायन्सने ग्राहकांसाठी धन धना धन ही आॅफर आणली होती. पण अनेक ग्राहकांनी आत्ता पर्यंत एकही रिचार्ज न केल्याने कंपनी अशा ग्राहकांची सेवा बंद करण्याच्या तयारीत आहे. या साठी काही दिवसांची मुदत देत कंपनीकडून रिचार्जसाठी मेसेज वा कॉलद्वारे अलर्ट पाठवले जातील. इतकचं नव्हे तर धन धना धन या आॅफरमुळं जिओने टिसीएस सारख्या कंपनीला मागे सारलं आहे. Also Read : Good News : जिओची डीटीएच सेवा लवकरच, सहा महिने फ्री टीव्ही चॅनेल्स !