See Pic : ‘तेरे नाम’च्या १४ वर्षानंतर भूमिका चावला कशी दिसते ?
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2017 12:23 IST
आज कशी दिसते भूमिका, पाहा तिचे लेटेस्ट फोटो...!
See Pic : ‘तेरे नाम’च्या १४ वर्षानंतर भूमिका चावला कशी दिसते ?
‘तेरे नाम’ची नायिका आपण कधीही विसरु शकत नाही. सलमानच्या या चित्रपटात भूमिकाने निर्जराचा रोल केला होता. आज या चित्रपटाला १४ वर्ष झाली असून तिच्या या पहिल्या चित्रपटात भूमिका चावला जेवढी सुंदर आणि इनोसंट दिसत होती विशेष म्हणजे ती आजदेखील तशीच दिसते. २००७ मध्ये भूमिकाचे लग्न झाले असून तिला ३ वर्षाचा एक मुलगा आहे. ती ३८ वर्षाची झाली असून नुकतेच आपण तिला ‘एम.एस.धोनी : द अनटोल्ड स्टोरी’ या चित्रपटात धोनीच्या बहिणीच्या भूमिकेत पाहिले आहे. मिळालेल्या माहितीनुसार लवकरच ती ‘एमसीए’ या तेलुगू चित्रपटात नानी या अभिनेत्रीसोबत तसेच तमन्ना आणि प्रभूदेवासोबतही एका बॉलिवूड चित्रपटात दिसणार आहे. भूमिकाचा २००३ मध्ये ‘तेरे नाम’ चित्रपटात जसा लुक होता, ती आजदेखील तशीच आहे. ना तिचा लुक बदलला आणि ना तिची स्टाइल बदलली. ती अगोदरही सिंपल आणि क्लासी राहत होती आणि आजदेखील अगदी तशीच आहे. भूमिकाची स्टाइल सुरुवातीपासूनच ट्रॅडिशनल आणि एथनिकच राहीली आहे. ती कुठेही कार्यक्रमात किंवा पार्ट्यांमध्ये जाते तेव्हा सॅटिन किंवा ट्रॅडिशनल ड्रेसमध्येच दिसते.