प्राण्यांमुळे उलगडले नेतृत्व गुणाचे रहस्य
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2016 11:19 IST
नेतृत्व गुण अनुभवातून विकसितनेतृत्व गुण कसे विकसित होतात यावर अनेक वर्षांपासून रिसर्च केले जात आहे. नुकतेच विविध क्षेत्रांतील तज्ज्ञांच्या टीमने याविषयी केलेल्या संशोधनातून असे दिसून आले, की मानव आणि प्राण्यात नेतृत्व गुण हे अनुभवातून विकसित होतात.
प्राण्यांमुळे उलगडले नेतृत्व गुणाचे रहस्य
नेतृत्व गुण कसे विकसित होतात यावर अनेक वर्षांपासून रिसर्च केले जात आहे. नुकतेच विविध क्षेत्रांतील तज्ज्ञांच्या टीमने याविषयी केलेल्या संशोधनातून असे दिसून आले, की मानव आणि प्राण्यात नेतृत्व गुण हे अनुभवातून विकसित होतात. संशोधकांच्या टीमने हत्ती, मीरकॅटसारख्या सस्तन प्राण्यांचे कळप आणि मानवामधील नेतृत्वाच्या पॅटर्नचा सखोल अभ्यास केला. यासाठी त्यांनी चार कसोट्यांवर नेतृत्वाचे विश्लेषण केले. त्या कसोट्या म्हणजे - विहार, अन्न गोळा करण्याची क्षमता, गटामध्ये होणार्या भांडणावर तोडगा काढण्याचे कौशल्य आणि दुसर्या कळपाशी होणारी देवाण-घेवाण.कॅलिफोर्निया येथील मिल्स कॉलजचे जेनिफर स्मिथ म्हणतात, 'पूर्वी असे मानले जायचे की प्राणी आणि मानवातील नेतृत्वगुणांचा विकास वेगळ्या पद्धतीने होते. मात्र आम्ही संशोधन करत असताना कोणतेच पूर्व ठोकताळे बांधले नव्हते.'इतर प्राण्यांच्या तुलनेत माणसांमध्ये नेतृत्वाची ताकद कमी असते. प्राण्यांच्या कळपात ग्रुप लीडर हा सर्वात पॉवरफुल असतो. त्याच्या विरोधात जाण्याची सहसा कोणी हिंमत करत नाही. ट्रेंडस् इन ईकोलॉजी अँड एवोल्युशन र्जनलमध्ये या संशोधनाबाबतचे वृत्त प्रकाशित झाले आहे.