वाद सुरु असातानाही सलमान IIFA सेरेमनीसाठी रवाना
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2016 16:53 IST
सुलतान चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान केलेल्या वादग्रस्त विधानासंदर्भात वादात अडकेला सलमान खानचे कुटुंब चांगलेच गुरफटून गेले आहे
वाद सुरु असातानाही सलमान IIFA सेरेमनीसाठी रवाना
सुलतान चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान केलेल्या वादग्रस्त विधानासंदर्भात वादात अडकेला सलमान खानचे कुटुंब चांगलेच गुरफटूनगेले आहे. मात्र वाद सुरु असतानाही तो IIFA सेरेमनीत उपस्थित राहण्यासाठी बुधवारी २२ रोजी मॅड्रिडला (स्पेन) येथे रवाना झाला आहे. सिक्युरिटीच्या गराड्यात घेरलेला सलमान मध्यरात्री मुंबई विमानतळावर ब्लॅक आऊटफिटमध्ये दिसला. त्याच्यासोबत त्याची आई सलमा खानदेखील उपस्थित होती. तसेच संजय दत्त, आलिया भट, नेहा धूपिया, अदिती राव हैदरी, निर्माता करण जोहर, बोमन ईराणी, अमिषा पटेल, अरबाज खानसुध्दा एअरपोर्टवर निदर्शनास आले.