IIFA स्टेज वरून ह्रतिकने केला सलमान खानचा अपमान
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2016 19:28 IST
सलमान खान आणि ह्रतिक रोशनचा वाद किती विकोपाला गेला आहे, याची प्रचिती आयफा सेरेमनीत दिसून आला.
IIFA स्टेज वरून ह्रतिकने केला सलमान खानचा अपमान
सलमान खान आणि ह्रतिक रोशनचा वाद किती विकोपाला गेला आहे, याची प्रचिती आयफा सेरेमनीत दिसून आला. त्यांचा हा वाद पुन्हा एकदा नव्याने समोर आला आहे. आयफाच्या पत्रकार परिषदेसाठी ह्रतिकने सलमान सोबत स्टेज शेअर करायला नकार देऊन एकप्रकारे त्याचा अपमानच केला आहे. असे म्हणावे लागेल. झाले असे की, मॅड्रिडमध्ये आयफाच्या पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या पत्रकार परिषदेला दीपिका पादूकोण, शाहिद कपूर, सलमान खान, प्रियांका चोप्रा, सलमान खान आणि हृतिक रोशन पोहोचले, पण हृतिकनं मात्र सलमान तिकडे असल्यामुळे स्टेजवर जायला नकार दिला. हृतिक रोशन आणि सलमान एकमेकांशी बोलतही नाहीत आणि जर कोणत्या पुरस्कार सोहळ्याला हे दोघं एकत्र आले तरी एकमेकांना टाळतात. हृतिकचा चित्रपट गुजारिशवर एकदा सलमाननं टीका केली होती. गुजारिश चित्रपट बघायला कुत्रापण जाणार नाही, असं सलमान म्हणाला होता. आता या टीकेचा बदला हृतिकनं सलमानचा अपमान करून घेतल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत.