रूपर्ट मर्डोक यांनी २५ वर्षे लहान सुपरमॉडलशी रचला विवाह
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2016 09:46 IST
मीडिया सम्राट रूपर्ट मर्डोक यांनी आज शुक्रवारी स्वत:पेक्षा २५ वर्षांनी लहान सुपरमॉडल जैरी हॉलसोबत विवाह केला. गत जानेवारीत दोघांचा लॉस एंजिलीस येथे साखरपुडा पार पडला होता.
रूपर्ट मर्डोक यांनी २५ वर्षे लहान सुपरमॉडलशी रचला विवाह
सध्या सुरु असलेल्या वेडिंग सीझनमध्ये आणखी एका हायप्रोफाईल विवाहाची भर पडली आहे. मीडिया सम्राट रूपर्ट मर्डोक यांनी आज शुक्रवारी स्वत:पेक्षा २५ वर्षांनी लहान सुपरमॉडल जैरी हॉलसोबत विवाह केला. गत जानेवारीत दोघांचा लॉस एंजिलीस येथे साखरपुडा पार पडला होता. रूपर्ट यांचा हा चौथा विवाह आहे. तर जैरीचा हा पहिला विवाह आहे. मात्र गायक सर मिक जैगरसोबत ती दीर्घकाळ लिव-इनमध्ये होती.मीडिया रिपोट्सनुसार, जैरी व जैगर यांची चार अपत्येही आहेत.मात्र जैगरला सोडून जैरी रूपर्ट यांच्या प्रेमात पडली. दोघांनीही काही महिने सोबत घालवल्यानंतर विवाह बंधनात अडकण्याचा निर्णय घेतला. आक्टोबरमध्ये या दोघांचे प्रेमसंबंध जगजाहिर झाले होते. आॅस्ट्रेलिया आणि न्यूझिलँड यांच्यातील रग्बी वर्ल्ड कप फायनल मॅच पाहण्यासाठी पोहोचलेल्या या जोडीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. मर्डोक यांच्या बहिणीने त्यांची व जैरीची भेट घालून दिल होती. १९३१ मध्ये आॅस्ट्रेलियात जन्मलेले मर्डोक तूर्तास अमेरिकेचे सिटीजन आहेत. ८५ हजार कोटी रूपयांच्या संपत्तीचे मालक असलेले मर्डोक मीडिया सम्राट म्हणून ओळखले जातात.