रेट्रो लूक घरही सजवतो!
By Admin | Updated: April 28, 2017 17:28 IST2017-04-28T17:28:40+5:302017-04-28T17:28:40+5:30
रेट्रो लूकला २०१७ मध्येही पसंती दिली जातेय ती घर सजावटीसाठी. घर सजावटीसाठी रेट्रो लूक फर्निचरचा ट्रेंड नव्यानं लोकप्रिय होतोय. तुम्हालाही हवाहवासा वाटतो ना रेट्रो लूक..नक्की ट्राय करा.

रेट्रो लूक घरही सजवतो!
-सारिका पूरकर-गुजराथी
काही दिवसांपूर्वी सतर-ऐंशीच्या दशकातील फॅशनची अर्थात रेट्रो लूकची पुन्हा चलती होती. पोलका डॉट्स, बेलबॉटम पॅण्ट्स, मोठ्या फ्रेमचे गॉगल्स...आता याच रेट्रो लूकला २०१७ मध्येही पसंती दिली जातेय ती घर सजावटीसाठी. घर सजावटीसाठी रेट्रो लूक फर्निचरचा ट्रेंड नव्यानं लोकप्रिय होतोय. तुम्हालाही हवाहवासा वाटतो ना रेट्रो लूक..नक्की ट्राय करा. कारण स्वस्तात मस्त असंही या सजावटीचं दुसरे नाव आहे.