‘समाधान मानणे’ हेच सुखी सहजीवनाचे रहस्य
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2016 20:30 IST
संसारिक जीवनात आनंदी राहायचे असेल तर जो जोडीदार आहे तोच तुमच्यासाठी सर्वोत्तम आहे असेच मानावे लागेल.
‘समाधान मानणे’ हेच सुखी सहजीवनाचे रहस्य
अनेक मोठे लोक म्हणून गेले की, जे आहे त्यात समाधानी राहावे. जास्त फळाची अपेक्षा केली तर चित्त शांत राहत नाही. असमाधानी मन हे सर्व दु:खाचे मूळ आहे.हे सगळं तुम्हाला केवळ कागदी तत्त्वज्ञान वाटत असेल; मात्र आता एका वैज्ञानिक अध्यायनाची त्याला पुष्टी मिळाली आहे.एका संशोधनानुसार तुम्हाला जर संसारिक जीवनात आनंदी राहायचे असेल तर जो जोडीदार आहे तोच तुमच्यासाठी सर्वोत्तम आहे असेच मानावे लागेल.आपल्याला यापेक्षा अधिक चांगला जोडीदार मिळेल किंवा मिळाला असता असा जर तुम्ही विचार करणार असाल तर तुम्ही खूश नाही राहू शकत. या अध्ययनाचे प्रमुख संशोधक डॅनियल कोन्रॉय-बीम सांगतात की, अनेक जण बोलून दाखवत नाहीत परंतु ते आपल्या जोडीदारासोबत समाधानी नसतात. आपण यापेक्षा अधिक चांगला साथीदार डिझर्व करतो असे त्यांना वाटत असते. डोक्यात अशा विचारांनी घर केल्यामुळे सुखाने संसार करणे अवघड होऊन बसते.म्हणूनच तर सध्या उपलब्ध असलेले अनेक डेटिंग अॅप्स आणि वेबसाईट नात्यांसाठी धोकादायक ठरत आहेत. क्लिकसरशी अॅपवर संभाव्य जोडीदारांची अमर्याद उपलब्धता व्यक्तीला सतत खुणावत असते. अशा प्रकारचा लोभ मग नात्याला अस्थिर करतो.