रैना लवकरच बनणार पप्पा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2016 17:49 IST
क्रिकेटपटू सुरेश रैना लवकरच पप्पा बनणार आहे. आयपीएलच्या नवव्या सीझनदरम्यान एका मुलाखतीत खुद्द रैनानेच ही गोड बातमी दिली
रैना लवकरच बनणार पप्पा!
क्रिकेटपटू सुरेश रैना लवकरच पप्पा बनणार आहे. आयपीएलच्या नवव्या सीझनदरम्यान एका मुलाखतीत खुद्द रैनानेच ही गोड बातमी दिली. गत ३ तारखेला सुरेश रैना व त्याची पत्नी प्रियंका या दोघांनी आपल्या लग्नाचा पहिला वाढदिवस साजरा केला. रैनाची पत्नी प्रियंका हॉलँडमध्ये सेटल आहे. तेथील एका बँकेत ती जॉब करते. रैनाने दिलेल्या माहितीनुसार, हॉलँडमध्ये पुढील महिन्यात डिलिवरी होईल. रैना सध्या आयपीएलमध्ये बिझी आहे. तेव्हा गुड लक रैना...