परफेक्ट काजळ लावण्यापूर्वी...
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2016 17:56 IST
काजळ लावण्यापूर्वी चेहरा टोनरने स्वच्छ करा.
परफेक्ट काजळ लावण्यापूर्वी...
काजळ मुलींच्या डोळ्यांचे सौंदर्य वाढवते. यामुळे प्रत्येक मुली काजळाचा मेकअपमध्ये समावेश करतात. काजळ लावणे ही एक कलाच आहे. काजळाचे स्ट्रोक कसे लावले जाते, याला खूप महत्त्व आहे. सध्या फक्त काजळ लावण्यालाच महत्त्व नाही ते परफेक्ट लावणे आवश्यक आहे. काजळ जर पसरले तर संपूर्ण मेकअप खराब होतो. यासाठी अशी घ्या याची काळजी... ► काजळ लावण्यापूर्वी चेहरा टोनरने स्वच्छ करा. यामुळे त्वचेवरील अतिरिक्त तेल नाहीसे होईल. यामुळे काजळ पसरण्याची शक्यता कमी होते. ►काजळ लावण्यापूर्वी डोळ्यांच्या खाली थोडी पावडर लावा. तुम्ही स्पंज किंवा ब्रशच्या मदतीनेही पावडर लावू शकता. ► नेहमी वाटर प्रुफ काजळाचा वापर करा. हे काजळ पसरत नाही तसेच खूप काळ टिकते. ► काजळ लावण्यापूर्वी आयलाईनर लावा.