- मोहिनी घारपुरे - देशमुख जॅकेटसच्या फॅशनमध्ये स्त्री पुरूष, तरूण-प्रौढ, लहान वृध्द असा फरक नाही. म्हणूनच प्रत्येकाच्या वॉर्डरोबमध्ये जॅकेटस हमखास आढळतात. आणि हल्ली पंतप्रधान नरेंद्र मोदींमुळे या जॅकेटच्या फॅशनला एक वलय प्राप्त झालं आहे. मोदी जॅकेटसमुळे इतर जॅकेटच्या फॅशनलाही हल्ली चांगले दिवस आले आहे. जीन्सवर ही जॅकेट्स एकदमच कूल दिसतात. वेगवेगळ्या ऋतूत वेगवेगळ्या कापडांच्या जॅकेट्सला युवावर्गाकडून पसंती दिली जाते. जीन्स, कॉटन, त्याचबरोबर कॅज्युअल, डेनिम, बाईकर जॅकेट्स असे साधारणत: पुरूषांसाठीच्या जॅकेट्समध्ये प्रकार आढळतात. उन्हाळा, पावसाळा, हिवाळा या ऋतूंच्या अकॉर्डींगली आणि जशी गरज असेल तशी यांपैकी वेगवेगळ्या प्रकारांची निवड केली जाते. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्वसाधारणपणे नेहेमीच जशी जॅकेट्स घालतात, त्या प्रकारच्या जॅकेट्सचा ट्रेण्ड अलिकडेच एकदम इन आहे. साधारणत: चाळीशीच्या घरातल्या पुरूषांपासून ते त्यावरील कोणत्याही वयोगटातील पुरूष आपल्या वॉर्डरोबमध्ये मोदी जॅकेट ठेवणं पसंत करतात असं दिसून आलं आहे.