‘पोकेमॉन गो’ आता भारतातही !
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2016 15:06 IST
आॅग्मेंटेड रिअॅलिटीवर आधारित ‘पोकेमॉन गो’ असा एक मोबाइल गेम आहे ज्याच्या बाबतीत यावर्षी सर्वाधिक बातम्या प्रसारित झाल्या. विशेष म्हणजे हा गेम आता भारतातही लॉन्च करण्यात आला आहे.
‘पोकेमॉन गो’ आता भारतातही !
आॅग्मेंटेड रिअॅलिटीवर आधारित ‘पोकेमॉन गो’ असा एक मोबाइल गेम आहे ज्याच्या बाबतीत यावर्षी सर्वाधिक बातम्या प्रसारित झाल्या. विशेष म्हणजे हा गेम आता भारतातही लॉन्च करण्यात आला आहे. मात्र, हे लॉन्चिंग पाहिजे तसे सोपे नव्हे, कारण याद्वारे रिलायन्स जियो देशभरात जास्तीत जास्त कस्टमरपर्यंत पोहोचण्याच्या प्रयत्नात आहे. यासाठी जियोने पोकेमॉनच्या डेव्हलपर्ससोबत पार्टनरशीपदेखील केली आहे. या अगोदर हा खेळ भारतात अनौपचारिकरित्या खेळला जात होता, मात्र आता येथील युजर्सदेखील याला डाऊनलोड करु शकतील. याला रिलायन्स जियोची मार्केटिंगदेखील म्हटली जाऊ शकते, कारण आता जास्त पोकेमॉन तिथेच मिळतील जिथे रिलायन्स स्टोअर्स असतील. निएंटिक इंक आणि रिलायन्स जियोच्या पार्टनरशिपनुसार संपूर्ण भारतातील हजारो रिलायन्स डिजिटल स्टोअर्स आणि पार्टनर्सच्या दुकानांना पोकेस्टोप आणि जिम बनविण्यात आले आहे. १४ डिसेंबर पासून या गेमला भारतातील अँंड्रॉइडवर (आयओएस) वर मोफत डाऊनलोड केला जाऊ शकतो. पोकेमॉन गो यूजर्स जियो चॅटिंग अॅपद्वारे खास पोकेमॉन गो चॅनलला जॉर्इंट करु शकतील, जिथे प्लेअर्स याबाबतीच्या टिप्स, ट्रिक्स आणि आणि सोबतच माहिती शेअर करतील. विशेष म्हणजे संपूर्ण जगभरातून आतापर्यंत पोकेमॉन गेमला ५०० मिलीयन डाउनलोड्स मिळालेले आहेत.