धोती आणि ट्यूलिप पॅण्टसमुळे पेहेरावाला मिळतो फॅशनेबल टच! तुम्ही ही फॅशन केली आहे का?
By Admin | Updated: May 29, 2017 18:49 IST2017-05-29T18:49:31+5:302017-05-29T18:49:31+5:30
वॉर्डरोबमध्ये असल्याच पाहिजेत अशा दोन स्टायलिश पॅण्टस म्हणजे ट्यूलिप आणि धोती. तुम्ही केली आहे का ही फॅशन?

धोती आणि ट्यूलिप पॅण्टसमुळे पेहेरावाला मिळतो फॅशनेबल टच! तुम्ही ही फॅशन केली आहे का?
-मोहिनी घारपुरे- देशमुख
वॉर्डरोबमध्ये असल्याच पाहिजेत अशा दोन स्टायलिश पॅण्टस म्हणजे ट्यूलिप आणि धोती. अलिकडच्या काळातल्या या दोन्ही स्टायलिश पॅण्ट्स महिलांच्या सौंदर्यात अधिकच भर घालण्यात यशस्वी ठरलेल्या आहेत. त्यांपैकी धोती हा प्रकार खरंतर पुरूषी वर्चस्व असलेला. पण फॅशनच्या जगात असा स्त्री पुरूष भेद नाहीच. उलट फॅशन विश्वानं अनेक नवे आयाम सौंदर्याला दिले आहेत, त्यापैकीच एक धोती आणि ट्युलिप पॅण्टस.
धोतीची फॅशन
खरंतर आपल्याकडे पुरूषांच्या पारंपरिक पोषाखाचा भाग असलेली धोती महिलांच्या वॉर्डरोबमध्ये केव्हा स्थानापन्न झाली ते लक्षातही आलं नाही. सुरूवातीला धोती स्टाईलच्या सलवारी आणि त्यावर कुर्ती असा पेहराव पंजाबी ड्रेसमधील स्टाईल म्हणून स्वीकारला गेला. त्यानंतर हळूच या धोती सलवार मागे पडत त्याऐवजी धोती पॅण्टसनी वॉर्डरोबमध्ये जागा मिळवली.