शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
3
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
4
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
5
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
6
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
7
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
8
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
9
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
10
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
11
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
12
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
13
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
14
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
15
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
16
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
17
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
18
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
19
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
20
"ज्यांचे स्वतःचे मत या मतदारसंघात नाही, त्यांना लोकांच्या मताची किंमत काय कळणार?"

रायगडमध्ये शेकापची आघाडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2017 7:04 AM

रायगड जिल्ह्यात सोमवारी झालेल्या १९१ ग्रामपंचायत निवडणुकीपैकी १३ ग्रामपंचायतींमध्ये केवळ थेट संरपंचाकरिता मतदान झाले, १६ ग्रामपंचायतींमध्ये केवळ ग्रामपंचायत

रायगड जिल्ह्यात सोमवारी झालेल्या १९१ ग्रामपंचायत निवडणुकीपैकी १३ ग्रामपंचायतींमध्ये केवळ थेट संरपंचाकरिता मतदान झाले, १६ ग्रामपंचायतींमध्ये केवळ ग्रामपंचायत सदस्य निवडीकरिता मतदान झाले तर १६२ ग्रामपंचायतींमध्ये थेट सरपंच आणि ग्रा.पं. सदस्य अशा दोन्हीकरिता मतदान झाले. परिणामी आज मतमोजणीअंती जिल्ह्याची एकूण अंतिम ग्रा.पं. सदस्य विजयी उमेदवारांची आणि थेट सरपंचांची आकडेवारी जुळवण्यात निवडणूक यंत्रणेला देखील अडचणी येत होत्या. मतदान झालेल्या १९१ ग्रामपंचायतींमध्ये थेट सरपंच आणि ग्रा.पं. सदस्यांची एकूण २ हजार १९८ पदे होती, त्यापैकी ८११ बिनविरोध झाली तर ७० पदे पात्र उमेदवार नसल्याने रिक्त राहिली. परिणामी १ हजार ३१७ सदस्य पदांकरिता ही निवडणूक झाली.अलिबाग : तालुक्यातील सहा ग्रामपंचायतींपैकी पाच ग्रामपंचायतींवर शेकापचे सरपंच विराजमान झाले आहेत. केवळ एकाच ग्रामपंचायतीवर काँग्रेसला समाधान मानावे लागले आहे. शिवसेना आणि काँग्रेससाठी हे निकाल अतिशय धक्कादायक असेच ठरले आहेत. शेकापने विजयी जल्लोष केला. आक्षी आणि मुळे या ग्रामपंचायतींवरील आपली पकड कायम ठेवण्यात शिवसेना अपयशी ठरली, तर काँग्रेसला हाशिवरे आणि शिरवली या ग्रामपंचायती गमवाव्या लागल्या आहेत. या चारही ग्रामपंचायतींमध्ये शेकापने आपला लालबावटा फडकविला आहे. काँग्रेसला केवळ बोरीस-गुंजीस ग्रामपंचायतीवर वर्चस्व प्रस्थापित करता आले आहे.अलिबाग तालुक्यातील ६ ग्रामपंचायतींची निवडणूक घेण्यात आली. या निवडणुकीत प्रथमच जनतेतून थेट सरपंच निवडण्याची संधी मतदारांना दिली होती. मंगळवारी तहसीलदार कार्यालयात मतमोजणी पार पडली. आक्षी, मुळे ग्रामपंचायतीमध्ये शिवसेना, बोरीस, हाशिवरे आणि शिरवलीमध्ये काँग्रेस तर, नारंगी येथे शेतकरी कामगार पक्ष असे सत्तेचे समीकरण होते. काही कालावधीनंतर हाशिवरे आणि शिरवली येथील सरपंच काँग्रेसमधून शेतकरी कामगार पक्षात दाखल झाले होते. आक्षी, मुळे या ग्रामपंचायतींमध्ये शिवसेनेचे वर्चस्व होते. शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे पुन्हा या ग्रामपंचायतींवर भगवा झेंडा फडकविण्याचे पाहिलेले स्वप्न भंगले आहे. या दोन्ही ग्रामपंचायतींवर शेतकरी कामगार पक्षाने आपले वर्चस्व सिद्ध केले आहे.नारंगी ग्रामपंचायतीवर शेतकरी कामगार पक्षाचा झेंडा फडकला. या ग्रामपंचायतीमध्ये शेकापचे ६ सदस्य तर १ काँग्रेसचा सदस्य निवडून आला. सरपंच पदाच्या शेकापच्या उमेदवार स्मिता पाटील या ६२४ मते मिळवून विजयी झाल्या तर त्यांच्या प्रतिस्पर्धी पद्मजा पाटील यांना २७६ मते मिळाली. नारंगी प्रभाग क्र मांक १ मधून विनोद पाटील १३७ मते मिळवून तर वर्षा पाटील १६१ मते मिळवून विजयी झाल्या. प्रभाग क्र मांक २ मधून राजेंद्र म्हात्रे २०६ तर शिल्पा म्हात्रे २६९ मते मिळवून निवडून आल्या. प्रभाग क्र मांक ३ मधून अमोल पाटील १९८ मते, अमृता म्हात्रे १८८ मते आणि सविता धुमाळ २८२ मते मिळवून विजयी झाल्या.उरणमध्ये शेकाप, काँग्रेसचा वरचष्माउरण : उरण तालुक्यातील १८ ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आहेत. १८ पैकी शेकाप काँगे्रस १०, शिवसेना ३, भाजपा आघाडी ४ व अपक्ष १ अशी बाजी मारली आहे.च्नवीन शेवा - निशांत घरत अपक्ष शेकाप पुरस्कृत, बोकडविरा - मानसी पाटील अपक्ष शेकाप आघाडी, भेंडखळ - भाग्यश्री चव्हाण शेकाप काँग्रेस आघाडी, डोंगरी - नीलेश घरत अपक्ष, पाणजे - करिश्मा भोईर भाजपा आघाडी, नवघर - आरती चोगले शिवसेना, पागोटे - भार्गव पाटील शेकाप आघाडी, घारापुरी - बळीराम ठाकूर शिवसेना, जसखार - दामोदर घरत भाजपा आघाडी, करळ - विश्वास तांडेल शिवसेना, धुतूम - रेश्मा ठाकूर शेकाप आघाडी, चिर्ले - प्रियांका मढवी शेकाप काँग्रेस आघाडी, रानसई - गीता भगत भाजपा बिनविरोध, क ळंबसुरे - नूतन नाईक भाजपा, पिरकोन - रमाकांत जोशी शेकाप काँग्रेस आघाडी, वशेणी - जीवन गावंड शेकाप काँग्रेस आघाडी, सारडे - चंद्रशेखर पाटील अपक्ष आणि पुनाडे - नीलम ठाकूर काँग्रेस आघाडी अशा निवडी झाल्या आहेत.१हाशिवरे सरपंच शेकापच्या संध्या पाटील. शेकापचे ३ तर शिवसेनेचे ६ सदस्य निवडून आले. यामध्ये प्रभाग क्र मांक १ मधून शशिकांत ठाकूर ४२६ मते, सलील मोकल ३३८ मते, अरु णा पाटील ३९९ मते मिळवून विजयी झाल्या. प्रभाग क्र २ मधून सागर पाटील ३०६ मते, सुप्रिया मोकल ४०८ मते , सुजाता पाटील ३५८ मते मिळवून विजयी झाल्या. प्रभाग क्र मांक ३ मधून अंकुर मोकल २५६ मते, शालिनी मोकल २६७ मते तर शैला पाटील यांना ३३९ मते मिळवून विजयी झाल्या.२मुळे ग्रामपंचायतीवर शेकापने सरपंच पदासोबत ६ जागा जिंकल्या. शिवसेनेचा एकच सदस्य निवडून आला. सरपंच शेकापच्या रोहिणी जंगम झाल्या त्यांनी शिवसेनेच्या सरपंच पदाच्या उमेदवार विशाखा पाटील यांचा पराभव केला. सदस्यांमध्ये प्रभाग क्र .१ मधून राजेश पाटील ९८ आणि मीनाक्षी पाटील ९८ मते मिळवून विजयी झाले. प्रभागक्र .२ मधून नीलेश जंगम यांना ७४ तर रेश्मा घरत यांना ७१ मते मिळाली. त्यांनी प्रतिस्पर्ध्यांच्या पराभव केला. प्रभाग क्र मांक ३ मधून रमेश पाटील १९४ , निर्मला थळे २२०, श्रुती थळे २१० मते मिळवून विजयी झाल्या.३शिरवली ग्रामपंचायतीमध्ये शेकापने बाजी मारली. सरपंच पदासह ६ सदस्य हे शेकापचे निवडून आले. तर काँग्रेस आणि शिवसेनेला १ जागेवरच समाधान मानावे लागले. सरपंच पदाच्या निवडणुकीत प्रमोद ठाकूर ३९१ मते मिळवून विजयी झाले. त्यांनी श्याम घरत यांचा पराभव केला. प्रभाग क्र मांक १ मधून प्रीतम म्हात्रे ११७ मते तर विश्रांती म्हात्रे ९६ मते मिळवून विजयी झाले. प्रभाग क्र मांक २ मधून मयुरेश म्हात्रे ७८ तर रेखा म्हात्रे १०८ मते मळवून विजयी झाले. प्रभाग क्र मांक ३ मधून मदन म्हात्रे १४९ , प्रीती ठाकूर १८५ आणि सिंधू म्हात्रे १८० मते मिळवून विजयी झाले. ४बोरीस गुंजीस ग्रामपंचायतीवरच वर्चस्व राखण्यात काँग्रेसला यश आले आहे. या ग्रामपंचायतीत सरपंच पदाच्या निवडणुकीत महेश पडते विजयी झाले. त्यांनी धवल राऊत यांचा पराभव केला. काँग्रेसचे ५ सदस्य निवडून आले तर शिवसेना, काँग्रेसला प्रत्येकी १ जागेवर समाधान मानावे लागले. प्रभाग क्र . १ मध्ये महेंद्र पाटील ९०, दीपा कटोर १६५ मते मिळवून निवडून आले. प्रभाग २ मधून रवींद्र बेर्डे १५१ मते, पूजा म्हात्रे ८७ मते मिळवून विजयी झाले. प्रभाग क्र मांक ३ मधून विलास पडते १६८, सोनाली पडते १७६, स्नेहा म्हात्रे १५७ मते मिळवून विजयी झाले.विजयी सरपंचच्नारंगी ग्रामपंचायत शेकापच्या स्मिता पाटीलच्हाशिवरे ग्रामपंचायत शेकापच्या संध्या पाटीलच्बोरीस-गुंजीस ग्रामपंचायत काँग्रेसचे महेश पडतेच्मुळे ग्रामपंचायत शेकापच्या रोहिणी जंगमच्शिरवली ग्रामपंचायत शेकापचे प्रमोद ठाकूरच्आक्षी ग्रामपंचायत शेकापचे नंदकुमार वाळंजसुधागडमध्ये राष्ट्रवादीची सरशीपाली : सुधागडात १६ आॅक्टोबरला झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा निकाल लागला. राष्ट्रवादीचे ८ ठिकाणी सरपंच, दोन शिवसेना, २ शेकाप, १ भाजपा, १ नागरी विकास आघाडीचे सरपंच विराजमान होणार आहेत. या १४ ग्रामपंचायतींपैकी दोन तिवरे व खवली येथील सरपंच हे बिनविरोध निवडून आले होते.तालुक्यातील राष्ट्रवादीचे विजयी सरपंच : खवली -रु चिता बेलोसे, शिलोशी-साधुराम साजेकर, सिद्धेश्वर बुद्रुक- उमेश यादव, चिवे- अनिता साजेकर, चंदरगाव - दर्शना चव्हाण, खांडपोली- नथुराम वालेकर, घोटावडे - पारू चौधरी, माणगाव बुद्रुक- माधवी मनेश पालवे.च्शेकाप सरपंचांची नावे : हातोंड आशा पाठारे, ताडगाव- छब्या जाधव, शिवसेना विजयी सरपंचांची नावे: आपतवने शरद चोरगे, तिवरे- सुलोचना देशमुख, भाजपा विजयी सरपंच : आतोने रोहन दगडे, अडूळसे येथे नागरी विकास आघाडीचे भाऊ कोकरे विजयी झाले. 

 

टॅग्स :bankबँक