झोपतांना मोबाईल जवळ नकोच
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2016 19:15 IST
रात्रीला झोपतांना मोबाईल फोन जवळ ठेवून झोपण्याची अनेकांना सवय आहे.
झोपतांना मोबाईल जवळ नकोच
रात्री झोपल्यानंतर आलेले कॉल व मैसेज चेक करण्यासाठी मोबाईल जवळ ठेवला जातो. परंतू, असे करणे हे जीवघेणे सुद्धा ठरु शकते. मोबाईलची चार्जींग सुरु झाल्यानंतर अनेकजण रात्रीला तो आपल्यापाशी ठेवून झोपी जातात. परंतू, हे खूप धोकादायक आहे. फिनलँडमध्ये अशीच एक घटना घडली असून, एका घरात तीन वर्षाच्या बालकाजवळ मोबाईल चार्जींगच्या वेळेला ठेवण्यात आला. तेथे स्फोट होऊन आग लागल्याची घटना घडली.स्मार्टफोनला चार्जींगला लावून एक महिला आपल्या तीन वर्षाचा मुलासोबत झोपली असता, मोबाईलमध्ये आग लागली. या आगीमुळे तेथे असणारे कपडेही जळून खाक झाले. त्यापूर्वीच त्या महिलांचे तीन वर्षाचे बाल त्या मोबाईलवर खेळत होते. त्याकरिता झोपतांना चार्जीगला लावलेला मोबाईल जवळ ठेवू नये. किंवा चार्जींग पूर्ण होताच मोबाईलची चार्जींग बंद करावी. अन्यथा मोठी दुर्घटना होऊ शकते.