समलैंगिक जोडप्यांची मुलंदेखील ‘नॉर्मल’
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2016 17:55 IST
समलैंगिक पालकांच्या सान्निध्यात वाढलेली मुलंदेखील स्त्री-पुरुष जोडप्यांच्या मुलांसारखी असतात
समलैंगिक जोडप्यांची मुलंदेखील ‘नॉर्मल’
जगभरामध्ये समलैंगिकता हा वादाचा आणि चर्चेचा विषय आहे. समलैंगिक जोडप्यांना मुलांचे संगोपन करण्याची जबाबदारी द्यावी कि न द्यावी यावर सध्या चर्चा सुरु आहे. समलैंगिक पालक असण्याचा लहान मुलांच्या एकूण वाढीवर कसा परिणाम होतो याविषयी अमेरिके त नुकतेच एक संशोधन करण्यात आले.त्यामध्ये असे दिसून आले की, समलैंगिक पालकांच्या सान्निध्यात वाढलेली मुलंदेखील स्त्री-पुरुष जोडप्यांच्या मुलांसारखी असतात. त्यांना कोणत्याच समस्या उद्भवत नाहीत. कौटुंबिक नातेसंबंध आणि मुलांचे एकंदर मानसिक आरोग्य एकदम सुरळीत असते.विल्यम्स इन्स्टिट्यूटचे प्रमुख संशोधक हेनी बोस यांनी सांगितले की, दोन वेगवेगळ्या प्रकारच्या कुटुंबात वाढणाºया कुटुंबांत मुलांची वाढ कशी होते यासंबंधी राष्ट्रीय पातळीवर केलेले हे पहिलेच संशोधन आहे. यामध्ये अनेक जुनाट संकल्पना मोडून पडल्या आहेत. समलैंगिक जोडप्यांची मुलंदेखील इतर कुटुंबात वाढलेल्या मुलांसारखी सामान्य असतात.बोस यांच्या टीमने 95 समलैंगिक जोडपे आणि 95 विरुद्ध लिंगी जोडप्यांचा शिक्षण, स्थान आणि वंश (रेस) यांच्या आधारे अभ्यास केला. समलैंगिकांकडे बघण्याचा दृष्टीकोन समाजात नकारात्मक असल्यामुळे त्यांना पालकाची भूमिका निभावताना अधिक तणावाला सामोरे जावे लागते, असा निष्कर्ष यावेळी काढण्या आला.