शहरं
Join us  
Trending Stories
1
दिवाळी एकत्र साजरी करू, पण अजित पवारांना पुन्हा पक्षात नो एंट्री; शरद पवारांनी परतीचे दरवाजे बंद केले...
2
महागाईवर सर्वात खळबळजनक रिपोर्ट; तीन वर्षांत कुटुंबांची घरगुती बचत ९ लाख कोटींनी घटली
3
साताऱ्याच्या बदल्यात राज्यसभा मिळाली! पार्थ पवारांना दिल्लीत पाठविण्यावर अजित पवारांचे मोठे संकेत
4
सुप्रियाने पवार-सुळे असे नाव लावले असते तर..? शरद पवारांनी सांगितला तिने घेतलेला एक निर्णय...
5
अदानी-अंबानींकडून टेम्पाेने पैसा आला का? मोदींच्या सवालावर राहुल गांधींचे चोख प्रत्तूत्तर...
6
नावात काय आहे? विचारत हायकोर्टाने फेटाळल्या नामांतराविरोधातील याचिका
7
कर्मचारी सुट्टीवर; विमाने जमिनीवर; ‘एअर इंडिया एक्स्प्रेस’ची ९० उड्डाणे रद्द
8
मी ठाण मांडून बसलो, म्हणजे करेक्ट कार्यक्रम होणार: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
9
शाळेत अ‍ॅडमिशन मिळणार का? न्यायालयात स्थगितीनंतर आरटीई ऑनलाइन अर्जाला ब्रेक, पालक अस्वस्थ 
10
हेड, अभिषेकने घातला धुमाकूळ; लखनौचा पाडला फडशा; हैदराबादचा १० गड्यांनी दणदणीत विजय
11
तीन वर्षांनंतर भारतात खेळणार नीरज; राष्ट्रीय फेडरेशन चषक स्पर्धेची उत्सुकता शिगेला
12
भारतीय अर्थव्यवस्था 8% दराने वाढणार; देशाच्या मुख्य आर्थिक सल्लागारांनी व्यक्त केला विश्वास
13
'इंडिया' आघाडी भ्रष्टाचारी; भाजपकडे नेता, नीती अन् विकासाचा कार्यक्रम तयार: अमित शाह
14
ट्रॅव्हिड हेडने कुटल्या १२ चेंडूंत ५८ धावा! अभिषेक शर्मासह ३६ चेंडूंत फलकावर चढवल्या १०७ धावा
15
महा-बीसीए, बीबीए, एमसीए, एमबीए CET प्रवेश परीक्षा २९ मे रोजी; सुधारित वेळापत्रक जाहीर
16
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
17
Air India ने 80 उड्डाणे रद्द केल्याबद्दल मागितली प्रवाशांची माफी; तिकीटाचे पैसेही परत करणार...
18
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
19
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
20
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज

घाई घाईत तयार होताय. या सात टिप्स वापरा आणि सुंदर दिसा!

By madhuri.pethkar | Published: November 29, 2017 6:20 PM

नोकरदार महिलांनी, सतत कामात असलेल्या महिलांना मेकअप करायचाच नाही का? तर असं मुळीच नाहीये. खरंतर सतत घाईत असलेल्या महिलांसाठी घाईतल्या मेकअपचा पर्यायही उपलब्ध आहे. त्यासाठी हे सात उपाय करायला हवेत.

ठळक मुद्दे* केस धुवायला वेळ नाही. पण केसांचा अवतार तर नीट करायचाय. अशा वेळी कोरड्या शाम्पूचा पर्याय वापरावा.* आॅफिसमधून लगेचच कुठे बाहेर जायचं असेल आणि केसांची जरा आकर्षक स्टाइल हवी असेल तर ती दोन मिनिटात करता येते. यासाठी पर्समध्ये बनाना क्लिप ठेवावी.* चेहरा सतत फुललेला दिसण्यासाठी तो छान ओलसर दिसणं गरजेचा असतो. यासाठी गुलाब पाण्याचा वापर करावा.

- माधुरी पेठकरनोकरदार महिला म्हणजे सतत घाईत असणा-या. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत सतत कामात. स्वत:कडे लक्ष द्यायला अजिबात वेळ नाही. मग निवांत आरशासमोर वेळ घालवून मेकअप करणं तर त्यांच्या आयुष्यातला दुर्मिळ योग.पण सतत घाई आणि कामं असली तरी छान तर त्यांनाही दिसायचं असतं. घर आणि आॅफिस सांभाळून त्यांनाही कुठे छोट्या मोठ्या पार्टीला, कार्यक्रमाला जायचं असतं. तिथे जाताना नेहेमीचा चेहे-यावरचा थकवा आणि त्रासलेलपण बाजूला ठेवून छान दिसावं असं त्यांनाही वाटतं. पण छान दिसायचं तर मग मेकअप हवा. आणि मेकअपसाठी तास दोन तास वेळ घालवण्याएवढा वेळ कुठे असतो? पण म्हणजे नोकरदार महिलांनी, सतत कामात असलेल्या महिलांना मेकअप करायचाच नाही का? तर असं मुळीच नाहीये. खरंतर सतत घाईत असलेल्या महिलांसाठी घाईतल्या मेकअपचा पर्यायही उपलब्ध आहे. त्यासाठी हे सात उपाय करायला हवेत. हे सात उपाय करून कितीही घाई असली आणि कार्यक्रमाला पटकन पोहोचायचं असलं तर आपण छान आणि आकर्षक दिसू शकतो.

 

 

घाईतल्या मेकअपच्या सात युक्त्या1) एकदम सकाळी एखाद्या कार्यक्रमाला जायचंय . पण केस धुवायला वेळ नाही. पण केसांचा अवतार तर नीट करायचाय. अशा वेळी कोरड्या शाम्पूचा पर्याय वापरावा. हा स्प्रे फॉर्ममध्येही मिळतो. हा शाम्पू केसांच्या मुळांवर स्प्रे करावा. आणि नंतर केसांवर कंगवा फिरवावा. केसांमधलं सर्व तेल आणि कचरा यामुळे निघून जातो आणि केस स्वच्छ दिसतात. दुस-या दिवशी सकाळी डोकं धुवावं. आणि समजा तेव्हाही घाई असेल तर केस धुतल्यानंतर लगेच टॉवेलमध्ये किंवा कॉटनच्या टी शर्टनं बांधावेत. टी शर्टमध्ये केसांचा ओलावा लवकर शोषला जातो. आणि केसांमधली नैसर्गिक आद्रता टिकून राहाते. याचा उपयोग केस सुंदर दिसण्यासाठी होतो. किंवा केस धुतल्यावर केसांना सिरम लावावं.2) हात -पाय छान दिसण्यासाठी पेडिक्युअर आणि मॅनिक्युअरचा पर्याय असतो. पण त्यासाठी पार्लरमध्ये जावून ते करायला वेळ नसेल तर घरच्या घरी अगदी कमी वेळेत हात पायाला पेडिक्युअर आणि मॅनिक्युअरचा इफेक्ट देता येतो. यासाठी हाता पायांना झोपण्यापूर्वी रोज पेट्रोलियम जेली लावावी. रात्रीभर ठेवावी. जेली लावून झाल्यावर हाता पायात सॉक्स घालावेत.3) कधी रात्री एखाद्या कार्यक्रमावरून परतताना उशिर होतो. मग झोपायलाही उशिर होतो. सकाळी रोजच्या वेळेत तयार व्हावं लागतं. त्यामुळे पुरेशी झोप होत नाही. अशा वेळेस डोळे सुजल्यासारखे दिसतात. ज्यामुळे आपला पूर्ण लूक बिघडतो. यासाठी स्किन कलरची किंवा पांढ-या रंगाची पेन्सिल डोळ्याच्या खालच्या भागावर फिरवावी. आणि लगेच आय लायनर लावावं.4) आॅफिसमधून लगेचच कुठे बाहेर जायचं असेल आणि केसांची जरा आकर्षक स्टाइल हवी असेल तर ती दोन मिनिटात करता येते. यासाठी पर्समध्ये बनाना क्लिप ठेवावी. ही क्लिप वापरून केस वर बांधून केसांची पफ स्टाइल करता येते. किंवा मग केस मस्त उंच बांधून पोनी टेलची स्टाइल करावी.

 

5) प्रत्येकीच्या घरात काही विविध रंगाच्या लिपस्टिकचा सेट नसतो. पण कधी कधी एखाद्या विशिष्ट रंगाच्या लिपस्टिकची अतिशय गरज वाटते. मग यासाठी ओठांना चांगल्या प्रतीचं मॉश्चरायझर किंवा जेली लावावी. आणि हवा असलेला शेडचा आयशॅडो लिपस्टिक म्हणून लावावा. अशा पध्दतीनं आय शॅडोचा उपयोग लिपस्टिकची गरज भागवू शकतो.6) चेहरा सतत फुललेला दिसण्यासाठी तो छान ओलसर दिसणं गरजेचा असतो. यासाठी गुलाब पाण्याचा स्प्रे   चेहे-यावर अधून मधून फवारावा.7) पापण्या छान टोकदार दिसण्यासाठी कापसाचा बोळा बेबी पावडरमध्ये बुडवावा. आणि पापण्यांभोवती फिरवावा. यानंतर परत एकदा मस्कारा लावावा.