नव्या वर्षात नात्याला द्या नवा विश्वास
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2016 07:51 IST
ब्रेक अप आणि वाढत्या घटस्फोटांच्या या काळात नाते टिकवणे फार अवघड झाले आहे. वैवाहिक जोडप्यांमधील संवाद दिवसेंदिवस खुंटत चालल्याने घटस्फोटांनाही निमंत्रण मिळत आहे. त्यामुळे नविन वर्षात नातेसंबंधाला नव्या विश्वासाने जोपासण्याची गरज आहे.
नव्या वर्षात नात्याला द्या नवा विश्वास
ब्रेक अप आणि वाढत्या घटस्फोटांच्या या काळात नाते टिकवणे फार अवघड झाले आहे. जोडप्यांमधील संवाद दिवसागणिक कमी होत आहे. अशा स्थितीत काहीतरी निमित्त शोधून विस्कटू पाहणारे हे नाते पुन्हा सावरता आले पाहिजे. नववर्षाची ही संधी यासाठी अगदी बेस्ट आहे. या नवीन वर्षात आपल्यातील नात्याला एक सुखद वळण देवून हा प्रवास आणखी रंजक केला जाऊ शकते. त्यासाठी या काही खास टीप्स...१. एकांताचे क्षण शोधानोकरी, स्पर्धा, मुलं या सगळ्यातून आपल्या जीवलगाला वेळ देणे शक्य होत नाही. अशाने दुरावा वाढत जातो. हे टाळायचे असेल तर केवळ दोघांसाठी वेळ राखीव ठेवून छोट्याशा ट्रिपवर जा. एकांतात एकमेकांच्या साथीने क्षण व्यतीत केल्याने मने अधिक जवळ येतात.२. एकत्र व्यायाम कराएकत्र व्यायाम करून रिलेशनशिपला रंजक ट्विस्ट तुम्ही देऊ शकता. एकत्र जिम मेंबरशीप घेऊन एकमेकांच्या साथीने वर्कआऊट करा, सकाळी जॉगिंगला जा. यामुळे ऐकमेकांना वेळही देता येईल.३. रोमान्स कमी होऊ देऊ नकालग्न झाले म्हणून लाईफमधील रोमान्स कमी होऊ नका देऊ. वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही यातील नावीण्य कायम ठेवू शकता. डान्स क्लब जॉईन करा, बेफिकीरपणे एकत्र गाणे गा किंवा साल्सा, स्विमिंग क्लास लावा. रोजच्या बोरिंग जीवनाला थोडेसे गंमतीशीर बनवा.४. मोबाईल जरा बाजूला ठेवामोबाईल ही आता गरज किंवा सोय राहिली नसून 'जित्याची खोड' बनली आहे. दोन क्षण मोबाईलपासून दूर राहणे लोकांना जमत नाही. जोडीदारासोबत असताना कटाक्षाने मोबाईल दूर ठेवा. फेसबुक, व्हॉट्सअँपच्या व्हच्यरुअल जगाऐवजी रिअल जगात जगण्याची सवय लावा.५. शब्द जपून वापराशब्दांचा घाव दोन मने कायमची दूर करू शकतो. त्यामुळे जोडीदाराशी संवाद साधताना समोरचा दुखावेल असे काही बोलू नका. त्यांच्या चांगल्या गोष्टींची स्तुती करण्यासाठी मात्र हातचे काही राखू नका. चुका दाखताना हिणवू नका. सुसंवाद हीच नाते टिकवण्याची खरी गुरुकिल्ली आहे, हे विसरून चालणार नाही.