कधीच वितळत नाही या गुहेतील बर्फ
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2016 06:39 IST
एका साहसी छायाचित्रकाराने या गुहेतील खडकाप्रमाणे कठोर बनलेल्या बर्फाचा खुलासा केला आहे.
कधीच वितळत नाही या गुहेतील बर्फ
उघड्यावरील बर्फ काही उष्णतेच्या संपर्कात येताच काही क्षणांमध्ये वितळून जातो. मात्र कॅनेडियन रॉक्समध्ये असलेल्या एका गुहेतील बर्फ वर्षानुवर्षे टिकून असून तो कधीच वितळत नाही. या गुहेमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून बर्फ गोठून जमा झालेला बर्फ खडकांप्रमाणे स्थिर आहे. अगदी द्रवात रुपांतर होण्यासारखे वातवरण असले तरी तो टिकून रहतो. एका साहसी छायाचित्रकाराने या गुहेतील खडकाप्रमाणे कठोर बनलेल्या बर्फाचा खुलासा केला आहे. त्याने या गुहेत खोलवर जाऊन निसर्गाची करण जगासमोर आणली आाहे. पॉल जीजका असे या छायाचित्रकाराचे नाव असून ही ४५९ फूट खोल गुहा त्याने स्वत: जाऊन पाहिली. तिथला बर्फ भविष्यातही वितळणार नाही, असे त्याला दिसून आले. या गुहेमध्ये काही जागा तस अशा आहेत की, तिथे मानवाला आपण उडत असल्यासारखे वाटते. या गुहेला ‘कोल्ड ट्रॅप केव्ह’ असे म्हटले जाते. तिथे हवा वाहते तेव्हा बाहेर पडणे अवघड होते. जीजका सांगतो की, ही अद्भुत जागा निसर्गाचे खरोखरच एक आगळे रूप दाखवते. या गुहेमध्ये बोलणे सर्वात कठीण ठरते. कारण तिथे आवाजाचे प्रतिध्वनी उमटत असतात व त्याचा कोणताच अंत नसतो.