"नाना पाटेकरांना राष्ट्रीय पुरस्कार मिळायला हवा होता"- इरफान खान
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2016 15:47 IST
'नटसम्राट' चित्रपटातील नाना पाटेकरांच्या अभिनयाचे सर्वांनीच कौतुक केले. प्रेक्षकांपासून ते मराठी सिनेसृष्टीतील कलाकार आणि तसेच हिंदी सिनेसृष्टीतील कलाकार मंडळींनी पण नानांचं कौतुक केले.
नाना पाटेकरांना राष्ट्रीय पुरस्कार मिळायला हवा होता- इरफान खान
'नटसम्राट' चित्रपटातील नाना पाटेकरांच्या अभिनयाचे सर्वांनीच कौतुक केले. प्रेक्षकांपासून ते मराठी सिनेसृष्टीतील कलाकार आणि तसेच हिंदी सिनेसृष्टीतील कलाकार मंडळींनी पण नानांचं कौतुक केले. यामध्ये अभिनेता इरफान खान याने नाना पाटेकर यांचं विशेष कौतुक केलं.'सैराट' च्या विशेष स्क्रिनिंगच्या दरम्यान इरफान खानने असं वक्तव्य केलं की, नटसम्राटमधील नाना पाटेकर यांचा अभिनय पाहता त्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळायला हवा होता. हे वाक्य विशेष आहे कारण पिकू चित्रपटासाठी अमिताभजी बच्चन यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळालेला, ज्या चित्रपटाचा इरफान खान पण एक महत्त्वाचा भाग होता.इरफान खानकडून आणखी एका गोष्टीचा खुलासा झाला की उमेश कुलकर्णीच्या विहिर, वळू आणि देऊळ या चित्रपटांपासून त्याने मराठी चित्रपट पाहायला सुरुवात केली. भविष्यात कधी चांगल्या दिग्दर्शकाकडून मराठी चित्रपटासाठी चांगला रोल मिळाला तर नक्की करेन, असंही इरफानने सांगितलं.