शहरं
Join us  
Trending Stories
1
आरक्षण द्यायचं, आंदोलन मोडायचं, की मला गोळ्या घालायच्या...; मनोज जरांगे-पाटील यांचा थेट इशारा
2
ऐन गणेशोत्सवात लालबागला जाणाऱ्या प्रवाशांचा होणार खोळंबा : ब्लॉकमुळे चिंचपोकळी, करीरोड स्टेशनवर लोकल नसणार!
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची इच्छा पूर्ण होणार, प्रत्येक कोपऱ्यात मराठे दिसणार! मनोज जरांगे-पाटील काय म्हणाले?
4
उधारीच्या वादातून वाहन विक्रेत्याचे अपहरण, मारहाणीचा व्हिडीओ स्नॅपचॅटवर अपलोड!
5
नागपूर हादरले! चाकू काढला आणि छातीवर सपासप वार; दहावीतील विद्यार्थिनीची शाळेसमोरच हत्या
6
Maratha Morcha Mumbai: मनोज जरांगेंना दिलासा, पण एका दिवसाचाच! पोलिसांचा निर्णय काय?
7
भारतावरील 'टॅरिफ' रशियन तेलामुळे नाही, तर ट्रम्प यांच्या नाराजीमुळे; अमेरिकन कंपनीचा दावा
8
'तुमचं तोंड भाजेल'; CM फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर पलटवार, आरक्षणाच्या मुद्द्यावरून सुनावलं
9
मुंबईतील 'या' ठिकाणी लोक पैसे देऊन तासभर रडतात, प्रवेशासाठी होते गर्दी; काय आहे रुईकात्स?
10
Asia Cup 2025 : सिंग इज किंग! हरमनप्रीतची हॅटट्रिक; अखेरच्या टप्प्यात चीनचा करेक्ट कार्यक्रम
11
Manoj Jarange Patil Morcha Update Live: मराठ्यांना आरक्षण देऊन टाकावं, मनं जिंकण्याची हीच संधी : मनोज जरांगे-पाटील
12
"मला माझ्या नवऱ्यापासून वाचवा..."; महिलेने कारमधून मारली उडी, रस्त्यावरच घातला गोंधळ
13
"नुसती आश्वासने देऊन चालणार नाही, कायदेशीर..."; जरांगेंचे उपोषण, CM फडणवीसांनी मांडली सरकारची भूमिका
14
चांद्रयान-5, तंत्रज्ञान , हायस्पीड रेल्वे अन् 10 ट्रिलियनची गुंतवणूक...भारत-जपानमध्ये १३ करार
15
सरिता हिची आत्महत्या नव्हेतर हत्याच... पती पुरुषोत्तम खानचंदानी यांचा आरोप
16
पंतप्रधान मोदींना जपानमध्ये मिळाली 'दारुम डॉल'; काय आहे या बाहुलीचा भारताशी संबंध?
17
"१९९१ मध्ये फसवणूक करूनच..."; सिद्धरामय्यांच्या एका विधानानं काँग्रेसच्या 'मतचोरी' प्रकरणाची 'लंका' लावली; भाजपला मिळाला आयता मुद्दा!
18
राहुल गांधींना बदनाम करण्यासाठी भाजप कोणत्याही थराला जाईल; संजय राऊतांची टीका
19
मनोज जरांगे-पाटील यांना तात्काळ अटक करा; गुणरत्न सदावर्तेंची पोलीस महासंचालकांकडे मागणी
20
एअरपोर्टवर तरूणीच्या सामानाचं झालं 'चेकिंग'; पोलिसांनी बॅग उघडताच बसला धक्का.. आत काय निघालं?

माझ्या पतीने प्रकल्प उभारले; मी शाळा उभारली!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2016 14:30 IST

मी एकदा पुरात वाहून गेलेल्या वस्तीतील मुलांमध्ये बसले आणि त्यांना विचारले की तुम्हाला तुमच्या नव्या...

मी एकदा पुरात वाहून गेलेल्या वस्तीतील मुलांमध्ये बसले आणि त्यांना विचारले की तुम्हाला तुमच्या नव्या शाळेत काय हवे आहे? एक म्हणाला, फूटबॉल खेळायला मैदान हवे आहे. दुसरा म्हणाला, संगणक हवे. एक छोटी मुलगी जवळ आली आणि म्हणाली, मॅडम, जमलच तर मुलींसाठी वेगळे स्वच्छतागृह बांधा. हे ऐकून मला वाटले की, या छोट्या छोट्या गोष्टी भवितव्यातील शिक्षणाच्या दृष्टीने किती मोठी भूमिका बजावू शकतात आणि मी शाळा उभारण्याच्या कामाला लागले. माझे पती उद्योग उभारून लोकांना रोजगार देत असताना मी त्या रोजगारासाठी सक्षम मनुष्यबळ तयार करणार्‍या शाळा उभारतेय याचे मला प्रचंड समाधान आहे, अशा शब्दात नीता अंबानी यांनी त्यांच्या विकासात्मक उपक्रमांची माहिती दिली.रिलायन्स फाउंडेशन या संस्थेच्या नीता अंबानी या संस्थापक आणि अध्यक्ष आहेत. ही संस्था भारतभर विविध समाजोपयोगी आणि विकासाचे विविध उपक्रम राबवीत असते, तसेच त्यासाठी निधी उपलब्ध करीत असते. रिलायन्स इंडस्ट्रीज्चे अध्यक्ष, व्यवस्थापकीय संचालक आणि सर्वांत श्रीमंत भारतीय असलेले मुकेश अंबानी यांच्या नीता या पत्नी आहेत. २0१४-२0१५ मध्ये रिलायन्स फाऊंडेशनने ७00 कोटी रुपये अशा विविध उपक्रमांवर खर्च केले. यापैकी बराचसा निधी ग्रामीण भागांत खर्च केला. शिक्षण हे या संस्थेचे पहिले लक्ष्य आहे. ग्रामीण आणि शहरी भारताला जोडण्यासाठी भारत इंडिया जोडो या प्रकल्पाद्वारेही विकासाचे त्यांचे काम जोरात सुरू आहे. या अंतर्गत कलेलाही प्रोत्साहन दिले जाते. शिकागो येथील कला संस्थेतर्फे आयोजित ' गेटस् ऑफ द लॉर्ड' या कला प्रदर्शनाची ही संस्था मुख्य प्रायोजक होती. यात कृष्णाशी संबंधित विविध चित्राकृतींचा समावेश होता. अशा प्रकारचे हे अमेरिकेतील पहिले प्रदर्शन होते. पिचवी कलेचे हे प्रदर्शन होते. या प्रसंगी त्यांच्याशी साधलेला संवाद.प्रश्न : नीताजी, या कलाप्रदर्शनात फेरफेटका मारल्यावर तुम्हाला कसे वाटले?नीता : विदेशात आमच्या संस्थेतर्फे एखादे कला प्रदर्शन आयोजित करण्याची आमची ही पहिलीच वेळ आहे. लोकांच्या प्रतिक्रिया ऐकून मन प्रसन्न झाले. भारतीय पारंपरिक कलेचे हे रुप पाहून अनेकजण विस्मयचकित झाले. हे बघून मी भारावले.प्रश्न : तुम्ही या कलेशी खूपच परिचित आहात आणि तुम्ही श्रीनाथजी यांचे अनुयायी आहात.. होय ना?नीता : होय, आमचे कुटुंब श्रीनाथजी यांचे अनुयायी आहोत. शिकागोच्या कलासंस्थेचे प्रमुख डगलस ड्रइग आणि भारतीय, दक्षिण-पूर्व आशियाई, हिमालयीन आणि इस्लामिक कला संस्थेचे सहप्रमुख मधुवंती घोष माझ्याकडे आले अणि माझ्याशी चर्चा केली. यामुळे माझी यात रूची वाढत गेली. याचे कारण म्हणजे भारतीय कलेचे विदेशात प्रदर्शन भरविण्याची ही एक संधी होती.प्रश्न : फाऊंडेशनच्या इतर घडामोडींविषयी सांगा. यात तुम्ही कोणत्या उपक्रमाशी जास्त जोडल्या गेल्या आहात?नीता : शिक्षण!प्रश्न : तुम्ही मुंबईत शाळा सुरू केली आहे?नीता : विवाहानंतर मुंबईत मी पहिली नोकरी केली ती शिक्षिकेची होती. आता आम्ही १३ शाळा चालवितो. आम्ही १५ हजार विद्यार्थ्यांना शिक्षण देत आहोत.आम्ही बारा वर्षांआधी धिरुभाई अंबानी इंटरटरनॅशनल स्कूलची स्थापना केली होती. तर शिक्षण ही माझ्या अगदी हृदयाजवळची गोष्ट आहे. कलाप्रदर्शनाच्या उद््घाटनप्रसंगी मी शिक्षणाविषयीच बोलले. उत्तराखंडमध्ये पूर आला तेव्हा आम्ही मदतकार्य केले. शाळा आणि घरांच्या उभारणीत आम्ही मदत केली. उद्ध्वस्त झालेल्या कुटुंबातील मुलांसोबत मी काही काळ घालवला.