मेस्सी टाटा मोटर्सचा ब्रँड अँम्बेसिडर
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2016 09:11 IST
लिओनेल मेस्सी याची भारतीय कंपनी टाटा मोटर्सचा जागतिक ब्रँड अँम्बेसिडर म्हणून निवड करण्यात आली आहे.
मेस्सी टाटा मोटर्सचा ब्रँड अँम्बेसिडर
तब्बल चार वेळा सर्वोत्कृष्ट फुटबॉलपटूचा मान मिळवणारा अर्जेंटिनाचा फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी याची भारतीय कंपनी टाटा मोटर्सचा जागतिक ब्रँड अँम्बेसिडर म्हणून निवड करण्यात आली आहे.टाटा मोटर्सने मेस्सीसोबत दोन वर्ष मुदतीचा करार केला आहे.मला भारताविषयी नेहमीच आश्चर्य वाटते. विविधतेने नटलेल्या या देशाविषयी मी अनेक चांगल्या गोष्टी ऐकल्या आहेत. मला पहिल्यांदाच एका भारतीय ब्रँडसोबत काम करण्याची संधी मिळाली आहे. त्यामुळे टाटा मोटर्स परिवाराचा सदस्य होण्यासाठी मी अतिशय उत्सुक आहे, असे मेस्सी म्हणतो.