जुन्या वर्तमानपत्रापासून वॉलहॅगिंग बनवा आणि झाड वाचवण्याचं पुण्य मिळवा!
By Admin | Updated: July 12, 2017 17:10 IST2017-07-12T17:10:44+5:302017-07-12T17:10:44+5:30
कागद फेकण्याआधी आपण त्याचा पुनर्वापर करू शकतो का? सूचतंय काही? नसेल सूचत तर ही गंमत करून पाहा.

जुन्या वर्तमानपत्रापासून वॉलहॅगिंग बनवा आणि झाड वाचवण्याचं पुण्य मिळवा!
- सारिका पूरकर -गुजराथी
आपल्या पृथ्वीला ग्लोबल वॉर्मिंगपासून वाचवायचं असेल तर ‘झाडं लावा, झाडं जगवा’असं सगळीकडे वारंवार सांगितलं जातं. पण प्रत्यक्षात मात्र असं घडत नाही. मोजके पर्यावरणप्रेमी सोडले तर झाडांकडे पाहायला कोणाला वेळच नाहीए. आपण याबाबत काही करू शकतो का?
तर हो... सध्या जी झाडं जिवंत आहेत ती तरी आपण कत्तलीपासून वाचवू शकतो. तुम्हाला माहीतच असेल की, आपण सारे ज्या कागदावर लिहितो, तो झाडांपासूनच बनतो. म्हणजे कागद तयार करण्यासाठी हजारो झाडांची कत्तल होत असते. आपण कागद फेकून देतो तेव्हा त्या झाडाला काय वाटत असेल? जरा विचार करा, कागद फेकण्याआधी आपण त्याचा पुनर्वापर करू शकतो का? सूचतंय काही? नसेल सूचत तर ही गंमत करून पाहा.
आपण रद्दीपेपर किंवा जुन्या मासिकांच्या कागदांपासून भिंतींवर टांगता येतील असे सुंदर ‘वॉलहॅँगिंग’ बनवू शकतो. कागदाच्या पुर्नवापराचा असा आखीव रेखीव पुर्नवापर करूनही आपण झाडे वाचवायला मदत करू शकतो.
पेपरपासून वॉलहॅगिंग कसं कराल?
* यासाठी घरातलं जुनं वर्तमानपत्र, जाड पुठ्ठा, फेव्हिकॉल, कात्री, स्केल आणि पेन हे साहित्य जमवा.
* सर्वांत आधी वर्तमानपत्रातून ४ इंच लांबी-रुंदीचे भरपूर चौकोनी तुकडे कापून घ्या. जाड पुठ्ठ्यावर एखादी मध्यम आकाराची ताटली ठेवून तिच्याभोवती पेननं गोलाकार आखून तो कापून घ्यावा.