घरीच बनवा लॅम्पशेडस अन लायटिंग !
By Admin | Updated: April 26, 2017 18:12 IST2017-04-26T18:12:07+5:302017-04-26T18:12:07+5:30
लॅम्पशेडसची आवड असेल पण जास्त पैसे खर्च करण्याची इच्छा नसेल तर मग आपण घरीच लॅम्पशेडस बनवू शकतो.

घरीच बनवा लॅम्पशेडस अन लायटिंग !
- सारिका पूरकर=गुजराथी
हॉल सजवण्यामध्ये लॅम्पशेडसला इतकं महत्त्वं आलं आहे की शहरात लॅम्पशेडची अनेक दुकानं दिसतात. दुकानातले नाजूक किंवा भव्य लॅम्पशेडस पाहताक्षणी मनात भरतात. मात्र घ्यायची इच्छा असेल तर बजेटचाही विचार करावा लागतो. लॅम्पशेडस ही काही स्वस्तात येणारी वस्तू नाही. लॅम्पशेडस घ्यायची इच्छा असेल तर मग खिशालाही झळ सोसावीच लागते. आणि जर लॅम्पशेडस हे नाजूक-साजूक असतील तर मग फुटण्याचीही भीती वाटते.
पण म्हणून लॅम्पशेडस वापरायचेच नाहीत असं काही नाही. लॅम्पशेडसची आवड असेल पण जास्त पैसे खर्च करण्याची इच्छा नसेल तर मग आपण घरीच लॅम्पशेडस बनवू शकतो.