माजा डार्विंग रोनाल्डोची नवी मैत्रिण एकोणवीस वर्षीय मॉडेल...
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2016 05:45 IST
रोनाल्डोची नवी मैत्रिण एकोणवीस वर्षीय मॉडेल माजा डार्विंगचं नाव तुम्ही ऐकलंय क...
माजा डार्विंग रोनाल्डोची नवी मैत्रिण एकोणवीस वर्षीय मॉडेल...
रोनाल्डोची नवी मैत्रिण एकोणवीस वर्षीय मॉडेल माजा डार्विंगचं नाव तुम्ही ऐकलंय का? प्रसिद्ध फूटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डोसोबत ती सध्या वारंवार एकत्र दिसत आहे. तिच्या रूपाने रोनाल्डोसोबत आणखी एक नाव जुळले आहे. पोतरुगीज वृत्तपत्र 'कोरियो दा महाना'ने अशा प्रकारचे वृत्त नुकतेच दिले आहे. माजा ही डेन्मार्कची मॉडेल आहे. मागील आठवड्यात मॅद्रिद चॅम्पियन लीग स्पर्धेदरम्यान या दोघांना एकत्र पाहण्यात आले. हे वृत्त सर्वत्र पसरताच माध्यमांनीही त्यांना गाठले. डेन्मार्कच्या 'बीटी'या वृत्तपत्राने या गोष्टीची दखल घेतली आहे. या दोघांची भेट कुणी आणि कशी घडवली याबाबबत तर्कवितर्क लढवले जात आहेत.