चेकवरील ‘ते’ आकडे काय दर्शविता हे जाणून घ्या !
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2017 15:02 IST
बऱ्याच ठिकाणी व्यवहारात आपण चेकचा वापर करतो, मात्र चेकवर अशा काही गोष्टी आहेत ज्याबाबत अजूनही आपणास सविस्तर माहिती नसते. त्या २३ डिजीट नंबरचा काय अर्थ आहे, याबाबत जाणून घेऊया.
चेकवरील ‘ते’ आकडे काय दर्शविता हे जाणून घ्या !
-Ravindra Moreबऱ्याच ठिकाणी व्यवहारात आपण चेकचा वापर करतो. चेकवर सही, नाव, रक्कमचा रकाना तसेच चेक नंबर आदी काही गोष्टी दर्शविल्या असतात, मात्र चेकवर अशा काही गोष्टी आहेत ज्याबाबत अजूनही आपणास सविस्तर माहिती नसते. आज आपण चेकवर दिलेल्या त्या २३ डिजीट नंबरचा काय अर्थ आहे, याबाबत जाणून घेऊया. * चेकवरील सर्वात खाली दिलेल्या त्या २३ आकड्यांपैकी सुरुवातीचे सहा आकडे चेक नंबर दर्शवितात. या नंबरचा उपयोग प्रामुख्याने रेकॉर्ड ठेवण्यासाठी होतो. * त्यानंतरचे ९ आकडे ‘एमआयसीआर’ कोड दर्शवितात. याचा अर्थ Magnetic Ink Corrector Recognition होय. विशेष म्हणजे हे आकडे संबंधीत चेक कोणत्या बॅँकेतून जारी झालाय ते कळते. चेक रीडिंग मशिन हा कोड वाचू शकते. या ९ आकड्यांपैकीच पहिले तीन आकडे हा शहराचा कोड दर्शवितात. त्यानंतरचे पुढील तीन डिजीट बँक कोड असतो. प्रत्येक बँकेचा एक युनिक कोड असतो. आणि उरलेले डिजीट हे शाखेचा कोड असतो. प्रत्येक बँकेच्या शाखेचा कोड वेगवेगळा असतो. * त्यानंतरचे सहा आकडे हे बँक अकाऊंट नंबर असतात. हा नंबर अनेक चेक बुक्समध्ये असतो. जुन्या चेकमध्ये हा नंबर नसे.* शेवटचे दोन आकडे हे ट्रान्झॅक्शन आयडी दर्शवितात.