इंन्स्टाग्रामवर किमचा दबदबा
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2016 15:41 IST
टीव्ही स्टार किम कर्दिशियनने इन्स्टाग्राम नेटवर्किंग साइटवर फालोअर्स मिळवण्याच्या बाबतीत गायिका बियोन्सला मागे टाकले आहे.
इंन्स्टाग्रामवर किमचा दबदबा
टीव्ही स्टार किम कर्दिशियनने इन्स्टाग्राम नेटवर्किंग साइटवर फालोअर्स मिळवण्याच्या बाबतीत गायिका बियोन्सला मागे टाकले आहे. कीपिंग अप विथ द किर्दशियन्स स्टारने या साइटवर ४ कोटी ४० लाख ५ हजार ६०४ फॉलोअर्स प्राप्त केले आहेत. क्र ेझी इन लव्ह गायिका बियोन्सचे इन्स्टाग्रामवर ४ कोटी ३९ लाख ३५ हजार फॉलोअर्स आहेत. बियोन्स हिच्यानंतर टेलर स्विफ्टचे ४ कोटी ३५ लाख फॉलोअर्स आहेत. इन्स्टाग्राम साइटवर सर्वाधिक फॉलोअर्स असलेल्या अव्वल १० जणांमध्ये सेलेना गोमेझ, अरिना ग्रँडे, जस्टिन बीबर, केंडल जेन्नर, केली जेन्नर आदींचा समावेश आहे.