जॅकेट्स

By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2018 07:54 AM2018-04-05T07:54:32+5:302018-04-05T07:54:32+5:30

रोज ठरावीक कुर्ते घालावेच लागतात. त्यांना नवा लूक द्यायचं काम करतात. ते जॅकेट्स

jacket fashion trends in Market | जॅकेट्स

जॅकेट्स

Next

भक्ती सोमण

आता काय घालायचं हा प्रश्न प्रत्येकाला छळतोच. कपाटांत कपड्यांना पूर; पण आज काय घालू हा प्रश्न काही सुटत नाही. रोज नवीन काहीतरी घालावंसं वाटतं म्हणून मग कपड्यांना वेगळा लूक द्यायचा प्रयत्न होतोय. आणि यात सध्या मदत होतेय ती जॅकेट्सची. सध्या फॅशन मार्केटमध्ये अशा जॅकेट्सचे एकसोएक प्रकार बघायला मिळत आहेत.

जर पांढऱ्या रंगाचा किंवा कोणत्याही डार्क कलरचा प्लेन कुर्ता असेल तर त्यावर जॅकेट्स एकदम हटके दिसतात. म्हणजे एकदा तुम्ही डार्क कुर्ता नुसताच वापरा. आठ दिवसांनी तोच घालावा वाटला तर त्यावर कलमकारी प्रिंट असलेले जॅकेट वापरा. एकदम वेगळा फील येतो. बरं या लूकमुळे तारिफ होते ती वेगळीच. जॅकेट्सचा हा ट्रेण्ड लक्षात घेऊन सध्या बाजारात वेगवेगळ्या प्रिंटची जॅकेट्स मिळायला लागली आहेत. किंबहुना पांढºया कुर्त्याला जोडून लाल, निळ्या, ब्राऊन रंगाचे जॅकेट कुर्ते सध्या इन आहेत.
कमरेपर्यंत उंची असलेल्या शॉर्ट जॅकेट्स तर कुर्ती, गाऊन, शॉर्ट टॉप्स, मॅक्सीवरही घालता येतात. या जॅकेट्समध्ये इकत, हॅण्ड ब्लॉक प्रिंट, इंडिगो प्रिंट लोकप्रिय आहेत. पण ट्रेण्डमध्ये आहेत ती कलमकारी प्रिंट. या कलमकारी प्रिंटमध्ये हत्ती, बुद्ध, फुलांची डिझाईन फेम्स आहेत. जी दिसायलाही एकदम हटके दिसतात. तुझं माझं ब्रेकअप सिरीयलमधल्या मीराने निळ्या प्लेनन कुर्त्यावर घातलेले लाल रंगाचे हत्तीचे जॅकेट बघून तर अनेक मुलींना तशा प्रकारचे जॅकेट घेण्याचा मोह होतो आहे. मुलींसाठी असे अनेक पर्याय असले तरी मुलांसाठी मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जॅकेट्ससारखी जॅकेट्स नेहमीप्रमाणे फेमस आहेत. याशिवाय जिन्सवर घालता येणारी लेदर जॅकेट्स, स्यूड इन आहेत.
फक्त थंडीमध्येच जॅकेट वापरायला हवे असं समजण्याचा काळ आता मागे पडला आहे. कुर्त्याच्या लूकचा विचार हल्ली जास्त होतो. जॅकेट हे प्लॅन कुर्तीला एक वेगळा लूक देते. हे जॅकेट तुम्हाला वेगवेगळ्या कुर्त्यांवर वापरता येते. त्याच्या वेगवेगळ्या प्रकारांमुळे कुर्त्याचा लूकही बदलतो आणि यात आपण आपल्या आवडीप्रमाणे अगदी साध्या लूकपासून इंडोवेस्टर्न लूक अशी कॉम्बिनेशन्स करू शकतो. म्हणून सध्या जॅकेट लोकप्रिय असल्याचे फॅशन एक्सपर्ट प्रियांका वैशंपायननी सांगितले. ही जॅकेट्स साधारण २५० रुपयांपासून ते ९०० रुपयांपर्यंत उपलब्ध आहेत. त्यात आॅनलाइनवर तर खूप पर्याय मिळतात. थोडक्यात काय तर हटके दिसण्यासाठी जॅकेट्सचाही खूप फायदा होतो.

लाँग जॅकेट
ही जॅके ट्स पायघोळ किंवा एॅन्कल लॅग्थ असतात. आजकाल लग्नात तर लॉँग कुर्ता विथ लॉँग जॅकेट्सचा प्रकार खूपदा वापरला जातो. या जॅकेट्समध्ये कलमकरी जॅकेट लोकप्रिय आहेत.
----
जॅकेट ब्लाऊज
आता प्लॅन किंवा सिम्पल बॉर्डर असलेल्या साडीवर जॅकेट घालण्याची फॅशन आहे. यात स्लिव्हलेस ब्लाऊजवर साडी नेसून त्यावर जॅकेट घालता येत असल्यामुळे पदर जॅके टच्या आत किंवा बाहेर ठेवता येऊ शकतो. यात सध्या पूर्ण बाह्यांचे, कॉलरचे, शॉर्ट असे प्रकार बघायला मिळत आहेत.


(लोकमतच्या मुंबई आवृत्तीत उपसंपादक आहे.)
bhaktisoman@gmail.com 

 

Web Title: jacket fashion trends in Market

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :fashionफॅशन