एखाद्या खास पार्टीत रिच आणि रॉयल दिसायचंय मग टियारा घाला!

By Admin | Updated: May 12, 2017 18:56 IST2017-05-12T18:40:25+5:302017-05-12T18:56:16+5:30

रिच आणि रॉयल दिसायचंय मग टायरची फॅशन करून बघा, चारचौघात नक्की उठून दिसाल.

If you want to see Rich and Royal in a special party then tiara! | एखाद्या खास पार्टीत रिच आणि रॉयल दिसायचंय मग टियारा घाला!

एखाद्या खास पार्टीत रिच आणि रॉयल दिसायचंय मग टियारा घाला!

एखाद्या खास पार्टीत रिच आणि रॉयल दिसायचंय मग टियारा घाला!

- मोहिनी घारपुरे-देशमुख

एखाद्या चित्रातल्या परीच्या किंवा फुलराणीच्या डोक्यावर फुलाफुलांचा हेअरबेल्ट आडवा करून लावलेला असतो तोच टियारा. हल्ली कॉलेजगोर्इंग मुलींमध्ये या टियाराची मोठी क्रेझ आहे.

फेअरवेल पार्टी, वेल्कम पार्टी, बर्थडे पाटी, लग्न अशा समारंभांना अनेक तरूणी थीम करून टियारा घालतात. इंटरनेटवरील वेगवेगळ्या फॅशन वेबसाईट्सवर हे टियारा विक्रीसाठी  उपलब्ध आहेत.

 कागदी वा कापडाची रंगीबेरंगी फुलं एका वायरमध्ये वा तारेत गुंफून हे टियारा बनवले जातात. काही उत्साही तरूणी तर हे टियारा घरी स्वत:च्या कल्पकतेचा वापर करून बनवतात. लहान मुलींसाठीही लहान आकारातील टियारा बाजारात उपलब्ध आहे.

फ्लोरल प्रिंटचे पार्टीवेअर गाऊन, रफल्सवाले फ्रॉक्स, मॅक्सी, नी लेंग्थ ड्रेसेस आदींवर हे टियारा छान दिसतात.

थीम पार्टीसाठीही जलपरी वगैरे थीम ठेवून हे टियारा घालून अनेक तरूणी धम्माल करताना दिसतात.

नवयुवतींमधली टियाराची वाढती क्रेझ लक्षात घेऊन बाजारातही मोठ्या प्रमाणावर ते उपलब्ध आहेत.

टियारामुळे रिच आणि रॉयल लूक मिळतो.आता आतापर्यंत फक्त मॉडेल किंवा चित्रपटातील अभिनेत्रीच हे टियारा घालत होते पण आता लहान मुलींपासून मोठ्यांपर्यंत कोणीही टियारा कॅरी करू शकतं. फक्त टियारा कॅरी करताना आपली बॉडी लँग्वेजही जरा ऐटबाजपणाची हवी इतकंच!

                            

Web Title: If you want to see Rich and Royal in a special party then tiara!