शहरं
Join us  
Trending Stories
1
६० नातेवाईक मिळून देवदर्शनाला गेलेले, बसला पहाटे भीषण आग, ८ जणांचा मृत्यू, २४ गंभीर
2
तिकडे मोदींची सभा, इकडे ठाकरे गटाचा मिहीर कोटेचांच्या कार्यालयात जोरदार राडा
3
मद्य धोरण प्रकरणात ‘आप’देखील आरोपी; ईडीने दाखल केले नवे आरोपपत्र, इतिहासातील पहिलीच घटना
4
आजचे राशीभविष्य १८ मे २०२४; जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्तीसाठी चांगला दिवस
5
तुमच्या हातात विकसित भारत सोपवूनच जाईन, मुंबईला धक्का लागू देणार नाही: PM नरेंद्र मोदी
6
महागाई, बेरोजगारी, खोटेपणा हीच मोदी यांची गॅरंटी: खरगे, २ कोटी रोजगारांवरुन चढवला हल्लाबोल
7
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही: सोनिया गांधी
8
सच्चा शिवसैनिक काँग्रेसला मतदान करणार नाही, आमच्याकडे खरी शिवसेना: CM एकनाथ शिंदे
9
अतिरेकी हल्ल्यातील शहिदांचा अपमान करणाऱ्यांना जागा दाखवा: देवेंद्र फडणवीस
10
नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार, त्यांच्याकडून महाराष्ट्राच्या अपेक्षा: राज ठाकरे 
11
तिकडे सगळे गद्दार, नकली, भाडोत्री लोक... इकडे सगळे असली आहेत; उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल
12
हीच भटकती आत्मा तुम्हाला सत्तेबाहेर बसवेल हे नक्की; शरद पवारांची सडकून टीका
13
आम्हाला जेलमध्ये पाहायचे नसेल तर इंडिया आघाडीच्या उमेदवारांना विजयी करा: अरविंद केजरीवाल
14
महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण, आमच्यासोबत आले आहेत राज ठाकरे: रामदास आठवले
15
मतदानाची आकडेवारी प्रसिद्ध करण्यात अडचण काय? सर्वोच्च न्यायालयाचा निवडणूक आयोगाला सवाल
16
४०० इमारतींवर होर्डिंग्जचा भार; स्ट्रक्चरल ऑडिटकडे महापालिका लक्ष देणार काय? 
17
भावेशच्या एजन्सीचे लाभार्थी कोण? बँक खात्याची पाळेमुळे खणणार, २६ मेपर्यंत पोलिस कोठडी
18
मतदारराजा तुझ्याचसाठी सर्व तयारी; मतदान प्रक्रियेसाठी शहर जिल्हा प्रशासन सज्ज
19
मुंबई इंडियन्सची लाजीरवाणी हार, शेवटच्या क्रमांकावर समाधान! रोहित शर्मा, नमन धीर यांचा संघर्ष व्यर्थ
20
"आता मराठीतही मेडिकल, इंजीनियरिंगचे शिक्षण घेणे शक्य होणार"! PM मोदींनी दिली आनंदाची बातमी

डोकेदुखीमुळे त्रस्त असाल तर वापरा हे घरगुती "फंडे"

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2017 4:18 PM

मुंबई,दि.23- डोकेदुखीसाठी मनानंच औषध घेण्यापेक्षा नैसर्गिक उपचार करणं जास्त हिताचं ठरतं. डोकेदुखीपासून वाचण्यासाठी काय करावं, यावर एक नजर...

ऑनलाइन लोकमतमुंबई,दि.23- वातावरणात बदल होणं म्हणजे अनेकांसाठी आजारपणाला निमंत्रण देण्यासारखं असतं. आता पावसाळ्यातही बऱ्याच जणांना सर्दी किंवा डोकेदुखीचा त्रास होत असतो. सर्वसाधारणपणे कोणत्याही डोकेदुखीमागे विविध कारणं असू शकतात. सामान्य डोकेदुखीवर उपाय करण्यासाठी औषधी किंवा गोळ्या घेण्याची गरज नाही. सातत्याने औषधं घेतल्यानं अनेकदा दुष्परिणाम होऊ शकतात. डोकेदुखी का होत आहे, याचं कारण आधी शोधलं पाहिजे. त्यानंतर त्यावर इलाज व्हायला हवा. डोकेदुखीसाठी मनानंच औषध घेण्यापेक्षा नैसर्गिक उपचार करणं जास्त हिताचं ठरतं. डोकेदुखीपासून वाचण्यासाठी काय करावं, यावर एक नजर...- पाणी प्या_शरीरातील पाणी कमी झाल्यानं म्हणजे डिहायड्रेशनमुळे बरेचदा डोकेदुखी होते. त्यामुळे मुबलक प्रमाणात पाणी पिणं हादेखील डोकेदुखीवर मात करण्यासाठी प्रभावी उपाय आहे.- मसाज करा_डोक्याच्या मागील बाजूला मसाज केल्याने डोकेदुखीपासून मुक्तता मिळते. जास्त जोर न लावताच खरंतर मसाज करणं आवश्यक आहे. यासाठी एखाद्या तज्ज्ञाचा सल्लाही घेता येईल.- अ‍ॅक्युप्रेशर करा_अंगठा आणि तर्जनी म्हणजे पहिल्या बोटाच्या मधल्या भागात असलेल्या मासावर एक मिनिटापर्यंत दाब द्या. त्यामुळे डोकेदुखीपासून सुटका होईल.- स्ट्रेच करून पहा_अनेकदा नसांच्या किंवा स्नायूंच्या ताणामुळे डोकेदुखी होते. त्यामुळे साधेपणानं मानेचं स्ट्रेचिंग केल्यानं डोकेदुखीवर आराम मिळेल; पण हे स्ट्रेचिंग करताना काळजी घेणं गरजेचं आहे.- बर्फाचा शेक_ डोक्याच्या नसांवर सूज असल्यामुळेही डोकेदुखी होऊ शकते. त्यामुळे कपाळ आणि कानाच्या जवळच्या भागावर बर्फाचा शेक देणं हितावह होईल. वातावरण पाहून हा शेक घ्यायचा किंवा नाही, हे ठरवा.- लवंग लाभदायक_व्यावर लवंगीच्या काही पाकळ्या शेकून घ्या. त्यानंतर गरम असलेल्या या लवंग रुमालात बांधून घ्या. त्यानंतर या रुमालातून लवंगीचा वास घेत राहा. असं थोडा वेळ केल्यामुळे फायदा होईल.- टरबूज खा_* टरबुजासारखं पाणीदार फळ खाल्ल्यानं चांगला फायदा होतो. त्यामुळे डिहायड्रेशनपासून होणाऱ्या डोकेदुखीपासून मुक्तता मिळते. त्यामुळे अशा फळांचा आपल्या आहारात नियमित समावेश करावा.- दीर्घ श्वसन करा_* ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे अनेकदा डोकेदुखी होते. त्यामुळे ज्या ठिकाणी जास्तीत जास्त ऑक्सिजन मिळतो अशा भरपूर झाडं असलेल्या भागात जावं. तिथं काही काळ दीर्घ श्वसनाचा अभ्यास करावा.- लिंबू पाणी देईल आराम_* लिंबूपाण्यात थोडं मीठ किंवा खाण्याचा सोडा घालून ते प्यावं. त्यामुळे शरीरातील आम्लांचं प्रमाण संतुलित होतं. शरीरातील आम्लांचं प्रमाण बिघडलं, तरी डोकेदुखी होते.- आलेयुक्त चहा_* आलेयुक्त चहा हा स्वादालाही चांगला लागतो आणि डोकेदुखीत आराम देतो. त्यामुळे दररोज आलेयुक्त चहा पिण्याची सवय लावा. त्यानं सामान्य आरोग्यही चांगलं राहतं.