डँड्रफ कसा तयार होता?
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2016 15:47 IST
आपल्या टाळूवर असलेल्या दोन बॅक्टेरियांच्या असंतुलनामुळे कोंडा निर्माण होतो.
डँड्रफ कसा तयार होता?
केसांमध्ये होणार कोंडा (डँड्रफ) फार कॉमन समस्या आहे. परंतु अतिकोंडा दैनंदिन जीवनात फार त्रासदायक ठरू शकतो.अनेक जणांचा असे वाटते की, कोंडा बुरशीमुळे (फंगस) तयार होतो. परंतु एका नव्या स्टडीतून याबाबत नवीन तथ्य बाहेर आले आहे.चीन आणि जपानच्या संशोकांनी केलेल्या अध्यायनात असे दिसून आले की, आपल्या टाळूवर असलेल्या दोन बॅक्टेरियांच्या असंतुलनामुळे कोंडा निर्माण होतो.प्रोपाओनिबॅक्टेरिअम आणि स्टॅफिलोकोकस हे दोन बॅक्टेरिया आपल्या केसांच्या मुळांपाशी असतात. जेव्हा एक बॅक्टेरिआ दुसºयावर अधिक प्रभावी होतो तेव्हा समतोल बिघडून कोंडा तयार होतो. जगाच्या अर्ध्यापेक्षा जास्त लोकांमध्ये कोंडा होण्याची समस्या आहे. या समस्येच्या उत्पत्तीबाबत तज्ज्ञांमध्ये मत-मतांतरे आहेत. आपल्या टाळूवर असलेले अतिसुक्ष्म जीव (मायक्रोआॅरगॅनिज्म), खास करून फंगस, यासाठी कारणीभूत आहे अशी एक धारणा होती. परंतु झँग मेंघुई यांच्या नेतृत्वाखाली शांघाय जियाओ टाँग विद्यापीठातील संशोधकांनी ती खोटी ठरविली.