‘सेंटर टेबल’ आणला विकत आणि ठेवला हॉलमध्ये असं करून कसं चालेल? तो शोभूनही दिसायला हवा ना! यासाठी हे कराच! -

By Admin | Updated: May 4, 2017 18:07 IST2017-05-04T18:07:11+5:302017-05-04T18:07:11+5:30

सेंटर टेबल घर सजावटीतील एक महत्वाचा घटक आहे.पण तो जर आपल्या हॉलमध्ये शोभून दिसायचा असेल तर काही गोष्टी माहिती असायलाच हव्यात.

How can I buy 'Center Table' and do this in a halls? It should not be seen as well! This is the Catch! - | ‘सेंटर टेबल’ आणला विकत आणि ठेवला हॉलमध्ये असं करून कसं चालेल? तो शोभूनही दिसायला हवा ना! यासाठी हे कराच! -

‘सेंटर टेबल’ आणला विकत आणि ठेवला हॉलमध्ये असं करून कसं चालेल? तो शोभूनही दिसायला हवा ना! यासाठी हे कराच! -

-सारिका पूरकर-गुजराथी

घरातील सोफा किंवा अन्य सिटिंग अरेंजमेंट कितीही छान असू देत पण सेंटर टेबल नसेल तर त्यांची शान अधुरी असते. हा सेंटर टेबल घर सजावटीतील एक महत्वाचा घटक आहे. पूर्वी केवळ टिपॉय म्हणून चार लाकडी पाय असलेला, सनमायका लावलेला टिपॉय घराघरात ठेवला जात होता. आता मात्र या सेंटर टेबलचंही रुप पालटलं आहे. अनेक आकारात, प्रकारात हे सेंटर टेबल्स उपलब्ध आहेत. पण आपल्या घराला, फर्निचरलाही ते शोभायला हवेत. असे सेंटर टेबल निवडायचे असतील तर ..!

 

सेंटर टेबलची अरेंजमेट करताना..

१) सेंटर टेबल मोठा असेल तर त्यावर एखाद-दोन तुमच्या आवडीचे पुस्तके मांडा. त्यामुळे टेबललाही एक मॅच्युअर्ड लूक येईल. छोटा फ्लॉवर वासे शेजारी ठेवला तर आणखी नजाकत वाढेल.

२) काही वेळेस सेंटर टेबलवर सुगंधित कॅण्डल्स मांडून ठेवा. सायंकाळी कॅण्डल लाईट वातावरण प्रसन्न करेल.

३) काही शिल्पं यावर मांडता येतील. परंतु आकारानं मोठी नकोत.

४) कॅक्टस, काही पान वनस्पतींची रचनाही सेंटर टेबलवर छान दिसते. तसेच गोलाकार टेबलवर चौकोनी ट्रे ठेवून त्यात फ्लॉवरपॉट मांडून हटके लूक ट्राय करता येतो.

५) सुंदर टेबलक्लॉथ अंथरुन सेंटर टेबल अधिक आकर्षक दिसू शकतो. त्यासाठीही असंख्य पर्याय उपलब्ध आहेत.

६) काचेचे सेंटर टेबल असतील तर त्याखाली छानसा रग अंथरा. यामुळे सेंटर टेबल अजूनच खुलून दिसतो.

Web Title: How can I buy 'Center Table' and do this in a halls? It should not be seen as well! This is the Catch! -

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.