सुंदर, सतेज, तरुण दिसण्यासाठी मॉडेल हॅले बाल्डविन वापरते स्वत:च्याच रक्तानं तयार केलेलं क्रीम!

By admin | Published: May 15, 2017 03:31 PM2017-05-15T15:31:54+5:302017-05-15T15:31:54+5:30

सौंदर्याचं राज : ‘व्हॅम्पायर फेशिअल’च्या मदतीनं हॅले बाल्डविननं आपलं वयही ठेवलंय ताजोतरार!

Hello, Baldwin uses a model made of own blood, to look beautiful, satis, young. | सुंदर, सतेज, तरुण दिसण्यासाठी मॉडेल हॅले बाल्डविन वापरते स्वत:च्याच रक्तानं तयार केलेलं क्रीम!

सुंदर, सतेज, तरुण दिसण्यासाठी मॉडेल हॅले बाल्डविन वापरते स्वत:च्याच रक्तानं तयार केलेलं क्रीम!

Next

 - सलोनी सरगम

 
सुंदर दिसण्यासाठी कोण काय करेल, याचा खरंच काही नेम नाही. कोणी प्लास्टिक सर्जरी करतं, कोणी ट्रान्सप्लान्टेशन करतं तर कोणी काही. आता ही अमेरिकन मॉडेलच पाहा. सुंदरतेच्या हव्यासापोटी ती काय करीत असेल? आश्चर्य वाटेल, आपली कांती नितळ दिसावी यासाठी ती चक्क स्वत:च्याच रक्तापासून बनवलेलं क्रीम वापरते! 
या प्रसिद्ध मॉडेलचं नाव आहे हॅले बाल्डवीन! अर्थात असं करणारी ती काही पहिलीच मॉडेल, सुंदरी नाही. याआधी प्रसिद्ध रिअँलिटी टीव्ही स्टार किम कर्दाशिअन हिनंही 2013मध्ये जाहीर केलं होतं, तिच्या सौंदर्याचं गुपित! तीदेखील आपल्या त्वचेच्या सुंदरतेसाठी स्वत:च्या रक्तापासून तयार केलेल्या क्रिमचा वापर करीत होती. तिच्या या खुलाशानंतर जगभर प्रचंड खळबळ उडाली होती. किम कर्दाशिअननंतर हॅले बाल्डविननं तिचाच कित्ता गिरवताना पुन्हा एकदा नव्यानं खळबळ उडवली आहे.
 
 
त्याचा तिला किती फायदा झालाय?
आता हे मोजमाप आपण करण्यात काय फायदा?
हॅले बाल्डविन म्हणते या क्रिमचा मला प्रचंड फायदा झालाय आणि होतोय.
आता ती म्हणतेय, तर होतच असणार तिला फायदा! नाही का?.

Web Title: Hello, Baldwin uses a model made of own blood, to look beautiful, satis, young.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.