शहरं
Join us  
Trending Stories
1
आजपासून 'GST' उत्सव! मध्यम वर्गाला होणार मोठा फायदा; खरेदी वाढणार, अर्थव्यवस्थेला बूस्टर मिळणार
2
आजचे राशीभविष्य- २२ सप्टेंबर २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार खास! आर्थिक लाभ होणार
3
ट्रम्प हे मित्र की शत्रू..अमेरिकेच्या २ निर्णयांनी भारताला बसला मोठा फटका; पुढे काय करायला हवं?
4
घोडबंदर भागातील धुमसता असंतोष राजकीय? शिंदेसेनेची कोंडी करण्यासाठी भाजपा घालतंय खतपाणी
5
IND vs PAK : नाद करायचा नाय! अभिषेक-गिलची विक्रमी भागीदारी; पाकसमोर पुन्हा टीम इंडियाची 'दादागिरी'
6
IND vs PAK : दोघांनी ठरवून पाकची जिरवली! मैदानात नेमकं काय घडलं? मॅचनंतर अभिषेकनं सगळं सांगितलं
7
IND vs PAK : "खूप मजा आली..." अभिषेकच्या आईसह बहीण कोमलनं उडवली शाहीन आफ्रिदीची खिल्ली (VIDEO)
8
IND vs PAK : ... अन् अभिषेक शर्मा पाकिस्तानी गोलंदाजाला भिडला! पंचांनी सोडवलं भांडण (VIDEO)
9
पाकिस्तानी ‘खेळाडूंना’ जपानमध्ये अटक; परदेशात जाण्यासाठी वापरला वेगळाच अन् अफलातून फंडा
10
राज्य सहकारी बँकेत पती-पत्नीला एकत्र नोकरीला असेल बंदी; विवाहानंतर ६० दिवसांत राजीनामा बंधनकारक
11
जनाब, आपल्या पायाखाली काय जळते ते पाहा...अमेरिकेची चाल, भारताभोवती तयार होतोय धोकादायक त्रिकोण
12
विशिष्ट समुदायासाठी उभारली जाते इमारत; गृहनिर्माण संस्थांना सदस्य निवडीचा अधिकार आहे का?
13
धगधगत्या ज्वालेतून आली जगन्माता, भक्ती दाटते नाव घेता...; कुलस्वामिनीच्या उत्सवाचे विविध रंग
14
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
15
दिवाळीच्या फटाक्यांवर सरसकट बंदीने प्रदूषणाचा प्रश्न सुटेल काय?
16
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
17
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
18
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
19
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
20
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन

आपला मोबाइल हरवला किंवा चोरीला गेलाय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2017 14:20 IST

बऱ्याचदा अनावधानाने आपला मोबाइल कुठे तरी विसरतो किंवा बस, ट्रेन किंवा मार्केटमध्ये चोरीला जातो. कुणाच्या हाती लागला तर मोठे नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र, आता मोबाइल चोरीला गेला तरी भीती बाळगण्याची गरज नाही...

बऱ्याचदा अनावधानाने आपला मोबाइल कुठे तरी विसरतो किंवा बस, ट्रेन किंवा मार्केटमध्ये चोरीला जातो. आपला मोबाइल म्हणजे स्मार्टफोन आपल्यासाठी एक मिनी कंप्युटरच असल्याने अतिशय महत्त्वाचा डाटा आपण त्यात सेव्ह केला असतो. जर तो मोबाइल चोरीला गेला किंवा हरविला आणि कुणाच्या हाती लागला तर मोठे नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र, आता मोबाइल चोरीला गेला तरी भीती बाळगण्याची गरज नाही, कारण कुणी मोबाईल चोरला, तर तुम्हाला त्याचं लोकेशनही मिळू शकतं. तसंच तुम्ही त्या मोबाइलमधला डेटाही डिलीट करू शकता.काय कराल?* आज जवळपास सर्व मोबाइलमध्ये Android Divice Manager असते. जर आपल्या मोबाइलमध्ये हे अ‍ॅप नसल्यास गुगलच्या प्ले स्टोरमधून डाऊनलोड करा.* डाऊनलोड झाल्यानंतर अ‍ॅप सुरू करा आणि Accept वर क्लिक करा.* Accept केल्यानंतर तुमच्या मोबाईल मध्ये हे अ‍ॅप अ‍ॅक्टिवेट होतं.* तुमचा मोबाइल शोधण्यासाठी तुमच्या कॉम्प्युटर किंवा टॅबलेटवर तुमचा जो इमेल आयडी गुगल प्लेस्टोरवर आहे, त्या मेल आयडीतून लॉग इन करा* त्यानंतर तुम्हाला उजव्या बाजूला वरच्या दिशेनं काही अ‍ॅप आयकॉन दिसेल. तिथं दिसणाऱ्या ‘प्ले’ या आयकॉनवर क्लिक करा.* प्ले स्टोर सुरू झाल्यावर तुम्हाला तुमच्या स्क्रीनवर उजव्या बाजूला वरच्या दिशेनं सेटिंग हा आयकॉन दिसेल. तिथे असणाऱ्या Android Divice Manager वर क्लिक करा.Android Divice Manager सुरू झाल्यावर तुमच्या हरवलेल्या मोबाइलचं मॉडेल नंबर सिलेक्ट करा.* आता तुमच्या मोबाइलमध्ये आलेल्या मॅपमध्ये मोबाईलचं लोकेशन दाखवलं जाईल. * मोबाइलच्या नावासह तुम्हाला आणखी तीन पर्याय दिसतील.* RING: यावर क्लिक केल्यास तुमच्या मोबाइलची पाच मिनिटापर्यंत रिंगटोन वाजत राहील.* LOCK: यावर क्लिक केल्यास एखादा नवीन पासवर्ड टाकून तुम्ही तुमचा मोबाइल लॉक करू शकता. याशिवाय तुम्ही एकादा टेक्स्ट मेसेजही लिहू शकता. जो मोबाइलच्या लॉक स्क्रीनवर येणार. तुम्ही तुमचा दुसरा नंबरही यात सेव्ह करू शकता. ज्याच्या कॉल आयकॉनवर जाऊन तुम्ही ज्याला मोबाइल मिळाला त्याच्याशी बोलू देखील शकता. महत्त्वाचं म्हणजे तुम्ही ज्या नंबरवरून कॉल करत आहात तो नंबर स्क्रीनवर दिसणार नाही.* ERASE: यावर क्लिक करून तुम्ही तुमच्या मोबाइलमधला संपूर्ण डेटा डिलीट करू शकता.