हरभजन शेरवानीत
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2016 12:19 IST
क्रिके टर हभजन सिंगच्या लग्न व पेहरावाची सर्वत्र जोरदार चर्चा ...
हरभजन शेरवानीत
क्रिकेटर हरभजन सिंग आणि अभिनेत्री गीता बसराच्या लग्नाची तयारी जोरात सुरू आहे. २९ आॅक्टोबरला या दोघांचे जालंधरमध्ये लग्न होणार असून तब्बल पाच दिवस वेगवेगळे कार्यक्रम आहेत. लग्नासाठी विविध डिझाईन्समध्ये कपडे तयार करण्याचे काम सुरू आहे. शेरवानी आणि बंद गळाचा सूट असा पेहराव हरभजन करणार आहे. डिझायनर राघवेंद्र राठोर आणि त्यांची टीम वेगवेगळी डिझाईन्सचे ड्रेस तयार करीत आहेत. एकूणच क्लासिक कलेक्शन करण्यात येत असून, फॅब्रिक आणि हेवी इम्ब्रॉयडरी असलेल्या कपड्यांचा यात समावेश आहे. ब्लू आणि पिंक कलरचे मिस्किंग करून दर्जेदार सूट तयार करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे आॅरेंज कुर्ता आणि ब्लॅक सूटची तयारी सुरू आहे. हरभजन या सगळ्या प्रक्रियेत स्वत: लक्ष घालून असल्याचे राठोर यांनी सांगितले . गीता बसराच्याही कपडयांची अनेक डिझाईन्स तयार करण्यात येत असून, त्यासाठी डिझायनर अर्चना कोचर आणि बबिता मलकानी वेगवेगळे प्रयोग करीत आहेत.